बंगळुरू - भारताचे सर्वात वजनी उपग्रह जीसॅट-11 बुधवारी भल्या पहाटे फ्रेन्च गुयाना येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले आहे. या उपग्रहाचे वजन तब्बल 5854 किलोग्रॅम आहे. युरोपची लाँचिंग एजेंसी एरियानेस्पेसचे रॉकेट एरियाने-5 च्या माध्यमातून भारतीय वेळेनुसार रात्री 2.07 वाजता याचे प्रक्षेपण झाले. या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर 16 जीबी प्रति सेकंद इतकी डेटा स्पीड मिळू शकेल. हे उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रोने तयार केले आहे.
- 30 मिनिटांच्या उड्डानानंतर रॉकेट वेगळे होऊन हे उपग्रह आपल्या निर्धारित कक्षेच्या दिशेने निघाले. पृथ्वीतलावरून 36 हजार किमी दूर अंतराळात स्थापित केले जात आहे. या उपग्रहाचा हेतू भारताच्या शहरी भागांसह ग्रामीण स्तरावर सुद्धा हायस्पीड इंटरनेट आणि डेटा ट्रांसफर सेवा प्रदान करणे असा आहे.
- या उपग्रहात प्रत्येकी 4-4 मिटर लांब असे दोन सोलार पॅनल लावलेले आहेत. या पॅनलच्या माध्यमातून 15 किलोवॅट ऊर्जा उत्पादन होईल. अंतराळात 15 वर्षे अखंडितपणे कार्यरत राहण्यासाठी हे उपग्रह तयार करण्यात आले आहे.
- जीसॅट-11 यापूर्वी 25 मे रोजी प्रक्षेपित केले जाणार होते. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव लाँचिंग पुढे ढकलण्यात आली. प्रत्यक्षात इस्रोचे उपग्रह जीसॅट-6ए लाँच केल्यानंतर अंतराळात हरवले होते. जीसॅट-6ए सदृश्य काही तुकडे सुद्धा जीसॅट-11 मध्ये लावण्यात आले आहेत. अशात कुठलीही रिस्क न घेता पुन्हा चाचणी घेण्यासाठी इस्रोला विलंब लागला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment