ज्योतिषमध्ये राशी चक्रातील दुसरी राशी आहे वृषभ, या राशीचे लोक असतात जास्त मेहनती
ज्योतिषमध्ये राशी चक्रातील दुसरी राशी आहे वृषभ. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल स्वभावानेच परिश्रमी आणि शांत असतो परंतु क्रोध आल्यानंतर उग्र रूप धारण करतो. असाच स्वभाव वृषभ राशीच्या लोकांचाही असतो. यांचा राग सहजपणे शांत होत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांच्या 15 खास गोष्टी...
वृषभ
नामाक्षर : ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
राशीचे स्वरूप - बैलासारखे
राशी स्वामी - शुक्र
1. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा मुळात कष्टाळू आणि शक्तिशाली असतो. तो सामान्यत: शांत असतो. परंतु राग आल्यास उग्ररूप धारण करू शकतो.
2. बैलासारखा स्वभाव वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये मुळातच आढळून येतो. या राशीचा स्वामी शुक्र आहे.
3. या अंतर्गत कृत्तिका नक्षत्राचे तीन चरण, रोहिणीचे चार आणि मृगाशीर्षाचे पहिले दोन चरण येतात.
4. या व्यक्तींच्या आयुष्यात पिता.पुत्र कलह असतो.
5. वडिलांकडे भूमीसंबंधी काम किंवा त्यातून एखाद्या उपजीविकेचे साधन असते. या राशीच्या मुलांना बहुतांश तामसी भोजनात स्वारस्य असते.
6. गुरूच्या प्रभावामुळे पुत्रामध्ये ज्ञानाप्रति अहंभाव निर्माण होऊ शकतो.
7. सरकारी कामांकडे कल असतो. सरकारी ठेकेदारीचे काम करून घेण्याची पात्रता असते.
8. मंगळाच्या प्रभावामुळे जातकामध्ये मनासिक गरमी निर्माण होते.
9. कारखाने, स्वास्थ्य कार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे कार्य हे लोक करू शकतात. यांच्या आईच्या आयुष्यात अडचणी जास्त असतात.
10. हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कला प्रिय असतात. केलेच्या क्षेत्रामध्ये नाव कमावतात.
11. आई आणि पतीची मदत किंवा आणि आई आणि पत्नीच्या मदतीने घरातील ताळमेळ साधू शकतात. हे लोक जोडीदाराच्या अधीन राहणे पसंत करतात.
12. चंद्र-बुधाच्या प्रभावामुळे या लोकांना आपत्य रुपात मुलगी होऊ शकते.
13. यांच्या जीवनात व्यापारी यात्रा जास्त प्रमाणात होतात. स्वतःच्या नियमांवर चालणारे असतात.
14. डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो. अनेकदा स्वतःच्या षडयंत्रामध्ये स्वतःचा अडकतात.
15. रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र असल्यामुळे यांच्या मनाची चढ-उताराची स्थिती कायम राहते.

Post a Comment