0
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

इंटरनॅशनल डेस्क - थायलंडमधून मर्डर आणि आत्महत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका व्यक्तीने अवघ्या 15 सेकंदात दोन-दोन मर्डर केले. त्याने सुरुवातीला एका गार्डवर गोळीबार करून त्याला ठार मारले. यानंतर आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडून तिचा खून केला. शेवटी स्वतःला शूट करत आत्महत्या सुद्धा केली. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या घटनेने लोकांना कळलेच नाही की नेमके काय होत आहे. गोळीबाराचा आवाज येताच स्थानिक मदतीला धावून आले. परंतु, त्यापैकी कुणीही जिवंत नव्हता. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.


स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा नुकताच ब्रेक-अप झाला होता. तो वारंवार आपल्या एक्स गर्लफ्रेंडला फोन करत होता. परंतु, ती काहीच प्रतिसाद देण्यास तयार नव्हती. याच दरम्यान ती आपल्या मित्रांसोबत एंजॉय करत असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्याच संतापात तो दारु पिऊन स्पॉटवर पोहोचला आणि मित्रांमधून गर्लफ्रेंडचा हात पकडून तिला नेत होता. या दरम्यान दोघांमध्ये भांडणही झाले. काही लोक तरुणीची मदत करण्यासाठी पुढे आले. त्याचवेळी एक्स बॉयफ्रेंडने लोकांना धमकावले आणि त्याच्या दिशेने येणाऱ्या सुरक्षा रक्षकाला गोळ्या घालून ठार मारले. दुसऱ्याच क्षणी एक्स गर्लफ्रेंड आणि स्वतःला सुद्धा शूट करून आयुष्य संपवले.

Post a Comment

 
Top