0
चामराजनगर येथील मठामध्ये प्रसाद खाल्ल्यानंतर 15 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.

चामराजनगर - येथील महादेश्वरा हिल सलुरू मठाचे महंत आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना प्रसादात विष मिसळण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला येथे एका मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमात प्रसाद वाटण्यात आला होता. तो खाल्ल्याने 15 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिस तपासात समोर आले की, भाविकांना मारण्यासाठी कट रचण्यात आला होता. त्यासाठी महंत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रसादात 15 बाटल्या किटकनाशके मिसळली होती.

हत्य आणि हत्येच्या प्रयत्नाचा आरोप
आयजी केव्ही शरत चंद्र यांनी सांगितले की, 52 वर्षांचे महंत पट्टदा इम्मादी महादेश्वरा स्वामी उर्फ देवन्ना बुद्धि आणि त्याचे तीन सहकारी (एक महिला, तिचा पती आणि एक मित्र) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न तसेच कटकारस्थान रचल्याचा आरोप आहे.


ऑक्टोबर महिन्यात ट्रस्टने मठात विशाल प्रवेशद्वार (गोपुरम) तयार करण्याचा निर्णय घेतला होता. महंतांना याबाबत सांगण्यात आले. त्यांना ते तमिळनाडूच्या आर्किटेक्टकडून बनवून घ्यायचे होते. त्यावर दीड कोटी खर्च होईल असे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर पुन्हा महंतांवर भ्रष्टाचाराचा आरोप जाला. ट्रस्टने त्यांची योजना रद्द केली. ही पैशाची नासाडी असेल असे ट्रस्टचे म्हणणे होते. त्यानंतर त्याऐवजी 75 लाख रुपयांत एक मंदिर तयार करण्याचा निर्णय घेतला. 14 डिसेंबरला याच मंदिराचे भूमीपूजन होते.


पोलिसांच्या मते, अपमानाचा बदला घेण्यासाठी पुजाऱ्याने हा कट रचला. 35 वर्षांच्या एका महिलेने पुजाऱ्याला विष दिले. महिलेचा पती आणि त्याच्या मित्राने ते प्रसादात मिळवले.


एप्रिस 2017 पर्यंत मंदिरावर महंताचा ताबा होता. त्याने त्यात बरेच पैसे कमावल्याचे म्हटले जाते. त्यानंतर स्थानिक लोकांनी ट्रस्ट स्थापन केली होती. त्यामुळे महंत नाराज होता. त्याची कमाई थांबली होती. यावरून वाद सुरू झाले होते.cleric of temple arrested in Karnataka food poisoning case

Post a Comment

 
Top