0
गेल्या 5 दिवसात 6 दुर्घटना,

बदनावर, धार (मध्यप्रदेश) : लेबल-नयागाव चौपदरी महागार्गावार रात्री अडीच वाजता अपघात झाला. या अपघातात अकील (28) याने आपले प्राण गमावले आहेत. 12 दिवसांपूर्वीच अकीलचा विवाह झाला होता. विवाहानंतर त्याच्या पत्नीच्या घरच्यांनी भोपळला रिसेप्शन ठेवले होते. आपल्या चार मित्रांसोबत सासरी जाण्यासाठी निघाले होते. पण वाटेतच अपघात झाला. 12 दिवसांपूर्वी हातावर रचवणाऱ्या पत्नीसमोर मंगळवारी आपल्या पतीचा मृतदेह होता. या मृत्यूसाठी तो अपघात जबाबदार नाही तर रस्ते सुधारण्याची जबाबदारी असणारे टोल वसूल करणारी कंपनी आणि ती एजन्सी सुद्धा आहे. या महागार्गावार नेहमीच अपघात घडत आहेत. या महागार्गावर गेल्या वर्षभरात जवळपास 50 जणांनी आपला प्राण गमावला आहे.
खड्ड्यांमुळे झाला अपघात
रात्री अडीच वाजता खड्ड्यांमुळे अकीलच्या कारला अपघात झाला. कार खड्ड्यात गेल्यामुळे आणि कार वेगात असल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले. कार पुलाच्या भींतीला धडकून डिवाइडरवर गेली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पलटी झाली. तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी जखमींनी रूग्णालयात पाठवले आणि पोलिसांनी घटनेची माहिती दिली.
मृत्यूला जबाबदार कोण?
या चौपदरी महागार्गावरील बदनावर ते मुलथान या 7 किमी मार्गावर गेल्या 5 दिवसांत 6 अपघात झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 17 लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सुद्धा टोल वसूलणाऱ्या कंपनी आणि एजन्सीने रस्त्यामध्ये सुधारणा केली नाही. येथील अपघातात मृत्यूप्रकरणी कंपनी आणि एजन्सीवर गुन्हे दाखल करायला हवेत.
इतके सगळे होऊनही परिस्थिती जैसे थे
या महागार्गावर होणाऱ्या सततच्या दुर्घटनांमुळे जनतेच्या मनात टोल कंपनीच्या गैरजबाबदारीमुळे आक्रोश वाढत आहे. टोल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे येथे अपघात होत आहेत. यामुळे येथील टोल कंपनी एस्सेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि त्या अधिकाऱ्यांवर कलम 304 नुसार खूनाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात यावी. तसेच टोल कंपनीने पीडित परिवारांना 10 टकके अधिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बदनावर येथील संघर्ष समितीच्या सदस्यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top