अायपीएलसाठी शिवमला २५ पट जास्त बाेली; ५ काेटी रुपयांत खरेदी
- मुंबई - देशांतर्गत क्रिकेटमध्ये अापल्या दमदार खेळीने छाप साेडणाऱ्या मुंबईच्या अाॅलराउंडर शिवम दुबेला अलीकडेच राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने (अारसीबी) त्याच्या बेस प्राइसपेक्षा २५ पट जास्त बाेली लावून त्यांच्या संघात घेतले. रणजी ट्राॅफीच्या ६ सामन्यांत ५५० धावा काढणाऱ्या शिवमला क्रिकेटपटू बनवण्याची त्याचे वडील राजेश दुबे यांची प्रचंड इच्छा हाेती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घर परिसरातच एक प्राेफेशनल खेळपट्टी तयार केली.
शिवम सांगताे की, हे यश पाहण्यासाठी मी दिवसात १२ तासांपर्यंत सराव करत क्रिकेट खेळलाे. मी सकाळी ६.३० वाजता सरावासाठी घराबाहेर पडायचाे. ७.३० ते ९.३० पर्यंत सराव करायचाे व सकाळी १० वाजेपासून सामने खेळायचाे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेपासून पुन्हा माझा सराव सुरू व्हायचा व ताे संध्याकाळी ५ पर्यंत चालायचा. पुन्हा एक तासाचेे प्रशिक्षणही व्हायचे. एवढे करून मी रात्री ७.३० ते ८ वाजता घरी पाेहाेचत असे. ज्या दिवशी बाहेर सराव हाेत नसे, तेव्हा मी घरातच बनलेल्या खेळपट्टीवर सराव करत असे.शिवम सांगताे की, क्रिकेटपटू बनायचे की इतर काही? याबाबत लहानपणी मला फार काही कळत नव्हते; परंतु मी क्रिकेटपटू व्हावे, असे माझ्या वडिलांना सुरुवातीपासूनच वाटायचे. क्रिकेट खेळणे मलाही अावडते; परंतु फुरसतीच्या वेळेत मी फुटबाॅल व टेबल-टेनिसही खेळताे. स्वत:चा खेळ व जीवनात शिस्त अाणण्याचे श्रेय ताे त्याचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना देताे. ताे त्यांच्यासंदर्भातील एक घटना सांगताे- मी चंद्रकांत पंडित सरांकडे सामना खेळत हाेताे. त्या डावात मी चांगली फलंदाजी केली हाेती. त्यामुळे अत्यानंदाने मी ताे सामना पाहणाऱ्या माझ्या अाईच्या कुशीत जाऊन बसलाे. ते पाहून पंडित सर माझ्यावर खूप रागावले. सामना सुरू अाहे अाणि तू येथे येऊन बसलास, असे ते मला म्हणाले.चंद्रकांत पंडित सांगतात की, शिवम १२ वर्षांचा हाेता तेव्हा त्याचे वडील त्याला माझ्याकडेे घेऊन अाले हाेते. माझ्या मुलाला धुवाधार फलंदाजी करणारा क्रिकेटपटू बनवा, असे ते मला म्हणाले हाेते. शिवम हा नैसर्गिक क्रिकेटपटू अाहे. ताे अायपीएलमध्ये खेळेल तेव्हा अनेक डावांत क्रिकेटप्रेमींना चकित करणारी कामगिरी करेल, अशी मला अाशा अाहे.५ चेंडूंवर ५ षटकार ठोकून आला चर्चेत
शिवम म्हणाला,राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून माेठी बाेली मिळण्यास बडाेदा संघाविरुद्धची कामगिरी कारणीभूत अाहे.बडाेदा संघाविरुद्ध त्याने ५ चेंडूंवर ५ षटकार लगावले. शिवमने रणजी ट्राॅफीत ६ सामने खेळून ५५० धावा फटकावल्या अाहेत. या सहा सामन्यांत त्याने २२ गडीही बाद केलेत. शिवम सर्वप्रथम हॅरिस शिल्ड टुर्नामेंटदरम्यानच चर्चेत अाला हाेता. विविध शाळांदरम्यान खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांत त्याने पाच गडी बाद केले हाेते. तसेच तीन डावांत अर्धशतकही काढले हाेते. त्यामुळे ताे अाॅलराउंडर म्हणून अाेळखला जाऊ लागला.
Post a Comment