0
शिक्षण अभ्यासक्रमही शिकतोय...

ब्यूनस आयर्स - साधारणपणे १२ वर्षे वयात बहुतांश मुले करिअरच्या बाबतीत विचार करत नाहीत. पण अर्जेंटिनातील लियोनार्डो निकानोर (१२) याने स्वत:ची शाळा सुरू केली आहे. गरीब व गरजू मुलांना शिक्षण देण्यासाठी त्याने ही शाळा सुरू केली. काही महिन्यांपूर्वी झोपडीत सुरू झालेल्या शाळेत आता ४ ते ४० वयापर्यंतचे ३६ विद्यार्थी येतात. लियोलास पिएड्रिटास शहरात राहतो. त्याने शाळेचे नाव पॅट्रिया युनिटी स्कूल असे ठेवले आहे. शाळा सुरू करण्याठी त्याच्या ७० वर्षांच्या आजीने मदत केली. ती या शाळेत शिकते आहे . लियोनार्डो म्हणाला, ज्यांना शाळेत प्रवेश घेणे शक्य नाही, अशा मुलांसाठी मी ही शाळा सुरू केली आहे.

शिक्षण अभ्यासक्रमही शिकतोय...
लियोनार्डो माझ्या घरापासून ४० मिनिटांच्या अंतरावर राहतो. तो शाळेतून येऊन आम्हाला शिकवतो. आता तो स्कॉलरशिप घेऊन शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करतो आहे. सर्वांचा तो लाडका आहे.

तोच शिक्षक व प्राचार्यसुद्धा
आजी रामोना यांनी सांगितले, आज लियोनार्डो शाळेत शिक्षक व प्राचार्य अशा दोन्ही भूमिका पार पाडतो आहे. मला त्याचा अभिमान वाटतो. त्याच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.12 years boy started school in argentina

Post a Comment

 
Top