महानगरपालिका अाणि पर्यटन विभागाचा संयुक्त प्रकल्प
- बडाेदा- गुजरातच्या बडाेद्यात डिस्ने लँडच्या संकल्पनेवर अाजवा पार्कमध्ये 'अातापी वंडरलँड पार्क' साकारण्यात अाले अाहे. या पार्कवर सुमारे १२५ काेटी रुपये खर्च झालेत. हे पार्क ८० एकर क्षेत्रात बनले असून, त्यातील ७५ एकरमध्ये ४० प्रकारचे अॅडव्हेंचर्स झोन अाहेत. त्यात विविध खेळांची सुविधा अाहे. हा मनपा व पर्यटन विभागाचा संयुक्त प्रकल्प अाहे. हे पार्क 'आतापी' नावानेही अाेळखले जाते. 'आतापी' हा पाली भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ 'संतुलित राहणे' असा अाहे, तर अधिकृत नाव 'आजवा अॅम्युझमेंट थीम अॅंड अॅडव्हेंचर पार्क ऑफ इंडिया' (अातापी) अाहे. राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मंगळवारी या पार्कचा शुभारंभ केला.२५ मीटर अन् उंच ३० मीटर रुंद प्रवेशद्वार
या थीम पार्कचे प्रवेशद्वार २५ मीटर उंच व ३० मीटर रुंद अाहे. हा प्रकल्प पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेल अंतर्गत विकसित करण्यात अाला असून, या 'वंडरलँड पार्क'मध्ये समान भागीदारीसाठी पर्यटन विभागाने ७५ काेटी रुपये महापालिकेला दिले अाहेत.
Post a Comment