0
जेटली म्हणाले, शून्य व ५% व्यतिरिक्त फक्त एकाच स्टँडर्ड दर असावा.

नवी दिल्ली - जीएसटीमध्ये १२% व १८% स्लॅबचे एकत्रीकरण करून एकच मानक दर निश्चित केला जाऊ शकतो, असे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. २८% स्लॅबमधील वस्तू कमी करण्यात येणार आहेत. यात फक्त चैनीच्या वस्तू व तंबाखूसारख्या अपायकारक वस्तू असतील. जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली. माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीही जीएसटी लागू होण्याआधी १५% आदर्श दराची शिफारस केली होती.

जेटली म्हणाले, शून्य व ५% व्यतिरिक्त फक्त एकाच स्टँडर्ड दर असावा. चैनीच्या वस्तूंवरच जास्त कर असावा. मात्र कर वसुली वाढल्यासच हे शक्य आहे. सध्या सर्वसामान्यांच्या वापराच्या सिमेंट व ऑटो पार्ट््स याच वस्तू २८% श्रेणीत आहेत.

सर्वाधिक ५१७ वस्तू १८% श्रेणीमध्ये
कर दर वस्तूंची संख्या
०% १८३
५% ३०८
१२% १७८
१८% ५१७
२८% २८
news about GST

Post a Comment

 
Top