अमेरिकेच्या रिकी मेना याने अाजारी मुलांना भेटता यावे म्हणून त्याने चक्क अापल्या नाेकरीवर पाणी साेडले.
- पीट्सबर्ग- अमेरिकेच्या रिकी मेना यास मुलांची खूप अावड असून, अाजारी मुलांना भेटता यावे म्हणून त्याने चक्क अाप्लया नाेकरीवर पाणी साेडले अाहे. तथापि, उदरनिर्वाहासाठी ताे ग्राफिक डिझाइनचे कामही करताे. यानंतर त्याने स्पायडरमॅनची वेशभूषा करून विविध रुग्णालयांत जात अाजारी बालकांचे मनाेरंजन करणे सुरू केले. ३५ वर्षीय रिकीला या कामात त्याची पत्नी कँडलही मदत करते. रिकीच्या या अागळ्यावेगळ्या कामामुळे मुलांना अाजाराशी लढण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे अनेक अाजारी मुलांचे अाई-वडील अाता स्वत:हून रिकीशी संपर्क साधून त्याला मुलांना भेटायला बाेलावू लागलेत. रिकीने अातापर्यंत ११ हजार मुलांची भेट घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य अाणण्याचा प्रयत्न केला अाहे.याबाबत रिकीने सांगितले की, मला मुले खूप अावडतात. मुले मला एखादा देवदूतच समजतात; परंतु मी एक सामान्य माणूस अाहे. मुलांच्या चेहऱ्यावर अानंद व हास्य अाणण्याचा माझा प्रयत्न असताे.
Post a Comment