या घटनेनंतर विषबाधा अन्न आणि पाण्यातून झाल्याचे काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी म्हटले आहे.
- नागपूर- भंडारा शहरात सुरु असलेल्या आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या शनिवारी सकाळच्या झालेल्या उद्घाटनानंतर देण्यात आलेल्या जेवणातून 115 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. जेवणानंतर मळमळ होणे, डोके दुखणे, उलट्या होणे, असा त्रास सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
97 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारानंतर क्रीडा संकुलनात विश्रांतीसाठी पाठविण्यात आले आहे. 18 विद्यार्थी त्यात 15 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थिंनीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान, या घटनेचे शहरात वृत पसरताच एकच खळबळ उडाली आहे. सर्व विद्यार्थी हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपुर जिल्ह्यातील आहेत. या घटनेनंतर विषबाधा अन्न आणि पाण्यातून झाल्याचे काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी म्हटले आहे.
Post a Comment