0
नियाेजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीची समस्या

जळगाव- पाेलिस प्रशासनाने अाॅगस्ट महिन्यापासून जिल्हा वाहतूक शाखा बंद करून या शाखेतील ५८ कर्मचाऱ्यांची नेमणूक शहर वाहतूक शाखेत केली हाेती. त्यामुळे शहर वाहतूक शाखेचे मनुष्यबळ हेे अाता थेट ११० झाले अाहे. असे असतांना शहरात वाहतूक काेंडीचा प्रश्न गंभीर झाला अाहे. नियाेजनाच्या अभावामुळे ही समस्या उदभवत असल्याचे बाेले जात अाहे; पण यामुळे वाहनधारक व पादचाऱ्याची दिवसेदिवस डाेकेदुखी वाढत असल्याने नाराजी व्यक्त केली जात अाहे.

गेल्या अाॅगस्ट महिन्यात तत्कालिन पाेलिस उप अधीक्षक सचिन सांगळे यांच्याकडे शहर वाहतूक शाखेची जबाबदारी अाली हाेती. त्याच वेळी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही या शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसुली हाेत असल्याची तक्रार पाेलिस अधीक्षकांकडे केली हाेती. त्यानंतर पाेलिस अधीक्षकांनी जिल्हा वाहतूक शाखा बंद करून या शाखेतील ६८ कर्मचाऱ्यांना पाेलिस मुख्यालयात जमा केले हाेते. त्यानंतर ५८ जणांची शहर वाहतूक शाखेत नेमणूक केली हाेती. या कर्मचाऱ्यांची नेमणूक शहर वाहतूक शाखेत झाल्यानंतर शहरातील वाहतूक काेंडीच्या समस्या संपुष्ठात येण्याची अावश्यकता हाेती; मात्र, त्यात काहीच फरक पडलेला नाही.

शहरात नेहमी वाहतूक काेंडी हाेणाऱ्या ठिकाणीची स्थिती 'जैसे थे' अाहे. शहरात पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर रिक्षांची काेंडी केवळ अधिकाऱ्यांच्या ये-जाण्याच्या वेळीच नसते. उर्वरित वेळी या ठिकाणाला रिक्षांचा गराडा असताे. याच रस्त्याने पुढे जिल्हा न्यायालयाकडे येताना बेंंडाळे महिला महाविद्यालयासमाेर दरराेज रिक्षा, उलट्या दिशेने येणारी वाहनामुळे वाहतूक काेंडी हाेते. यावर वाहतूक शाखा चार महिन्यात काेणतेही उत्तर शाेधू शकलेली नाही. काेर्ट चाैकात काेपऱ्या उभे राहून माेबाईल बघत बसणारे पाेलिस कर्मचारी वीज गेल्यावर चाैकातील काेंडी साेडविण्यासाठी प्रयत्न करताना क्वचितच दिसतात. नेहरु चाैकात गेल्यास स्थिती अधिक भयावह हाेते. या चाैकात सिग्नल यंत्रणाच नाही. त्यामुळे या चाैकात वाहनचालकांच्या मर्जीने वाहतूक सुरु असते. रेल्वे स्थानकावरून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी या चाैकात रिक्षा चालकांनी अनधिकृत थांबा बनविला अाहे. त्यावर वाहतूक शाखेचे नियंत्रण नाही. टाॅवर चाैकातही हीच स्थिती अाहे. या चाैकातील अधिकृत रिक्षा थांब्यावर उभ्या रिक्षा साेडून इतरही रिक्षा चालकांकडून टाॅवर ते काँग्रेस भवन हा रस्ता व्यापलेला असताे. जुने बसस्थानकाचा परिसर हा सर्वात जास्त वाहतूक काेंडी हाेणार परिसर अाहे. या चाैकात मलारा मार्केटच्या गल्लीत उभ्या राहणाऱ्या रिक्षा, बसस्थानका लगतच्या अधिकृत थांब्या व्यतिरिक्त चार ते पाच ठिकाणी रिक्षा उभ्या राहतात. त्यामुळे वाहतुकीची काेंडी हाेते.

शहर वाहतूक शाखेने चित्रा चाैक ते काेर्ट चाैकदरम्यान हाेणारी वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी गाेलाणी मार्केट लगतच्या 'वन-वे'चे सहा महिन्यांपूर्वी पुनर्जीवन केले हाेते. महिना-पंधरा दिवस हा वन-वे अस्तित्वात राहिला. त्यानंतर पुन्हा तिच वाहतूक काेंडी दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ हाेत अाहे. या रस्त्यावर गुजरात स्वीट मार्ट, इच्छापूर्ती गणेश मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, इंडाे-अमेरिकन हाॅस्पटलची जुनी इमारत अादी ठिकाणी दिवसातून किमान चारपाच वेळा वाहतूक काेंडी हाेत असते. त्यावर वाहतूक शाखेला काेणताही मार्ग काढता अालेला नाही.
Traffic crisis problem due to lack of coverage in Jalgoan

Post a comment

 
Top