पुणे - पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीचा महाबळेश्वर येथील हॉटेलात खून केला. यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कपलच्या 11 वर्षांच्या मुलासमोरच घडली. त्यानेच पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. महाबळेश्वरला सहकुटुंब फिरण्यासाठी गेले असताना या कपलमध्ये जोरदार भांडण पेटले होते. त्याच भांडणानंतर रागाच्या भरात पतीने हा कांड केला असे पोलिसांनी सांगितले आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहणारे अनिल शिंदे, त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा आदित्य हे तिघे फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेले होते. ठरल्याप्रमाणे सगळेच 5 डिसेंबर रोजी सगळेच महाबळेश्वरला पोहोचले आणि येथील एका हॉटेलात थांबले होते. परंतु, रात्रीच अनिल आणि सीमा यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये भांडण इतके पेटले की पती अनिलने रागाच्या भरात चाकूचे वार करून सीमाची हत्या केली. यानंतर त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरला आणि आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार घडला त्यावेळी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा आदित्य त्याच खोलीत होता. इतक्या भयंकर घटनेनंतर प्रचंड घाबरलेल्या आदित्यने संपूर्ण घटनाक्रम आपल्या नातेवाइकांना फोन करून सांगितला. त्यांनीच यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. या दोघांमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला यासंदर्भातील सविस्तर तपास सध्या पोलिस करत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment