0
नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. ट्रक आणि एका व्हॅनमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडे नऊच्या सुमारास घडला. कोरपना-वाणी रोडवरून एक व्हॅन जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, उपचार सुरू असताना आणखी एकाचा जीव गेला. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सात महिला, व्हॅन ड्रायव्हर, तीन वर्षांची मुलगी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला.
Chandrapur Accident kills 11 including 3 year old

Post a Comment

 
Top