0
राजस्थानात अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

भोपाळ / जयपूर / रायपूर - मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा एकाच दिवशी पार पाळला जात आहे. यात सर्वप्रथम राजस्थानात अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापित केली आहे. तिन्ही राज्यांमध्ये आमदारांनी आपल्या पसंतीचा नेता निवडला. या शपथविधी सोहळ्यांपैकी एक राजस्थानात देशभरातील 10 राजकीय पक्षाचे नेते, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी उपस्थिती लावली आहे.

अशोक गहलोत मुख्यमंत्री, सचिन पायलट उप-मुख्यमंत्री

राजस्थानात अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री तसेच सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (तेदेप), एमके स्टॅलिन (द्रमुक), तेजस्वी यादव (राजद), शरद पवार (राष्ट्रवादी), एचडी देवेगौडा (जेडीएस) आणि त्यांचा मुलगा कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारास्वामी, आमदार राजेश कुमार (सप), शरद यादव (लोजद), फारुक अब्दुल्ला (नॅशनल काँफ्रेन्स), हेमंत सोरेन (झामुमो), बदरुद्दीन अजमल (एआययूडीएफ). यानंतर ममता बनर्जी, अखिलेश यादव, मायावती आणि सोनिया गांधी यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, अखिलेश यांनी ट्वीट करून आपला प्रतिनिधी पाठवत असल्याचे सांगितले.

मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचाही शपथविधी
काँग्रेस नेते कमलनाथ मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ दुपारी 1.30 वाजता घेणार आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसला 114 जागा मिळाल्या. बहुमत मिळवण्यासाठी त्यांना बसपच्या मायावतींनी आपल्या 2 आमदारांचे समर्थन दिले. सोबतच 4 अपक्ष उमेदवारांच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापित केली. तर छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदी भूपेश बघेल यांची निवड झाली. त्यांचा शपथ विधी सोहळा सायंकाळी 4.30 वाजता पार पडणार आहे.
Rajasthan, MP And Chattisgarh CM Oath Taking Ceremony

Post a Comment

 
Top