0
दिव्य मराठी विशेष पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय

  • नाशिक- नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थातच १ जानेवारी २०१९ पासून भारत संचार निगम लिमिटेड त्यांच्या सर्व प्रकारच्या ग्राहकांना (लॅण्डलाइन, मोबाइल, ब्रॉड-बॅण्ड, एफटीटीएच) छापील बिलाऐवजी फक्त इ-बिलच देणार आहेत. त्यामुळे छापील बिल ही प्रक्रियाच अस्तित्वात राहणार नाही. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने बीएसएनएलने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नाेंदणी करणाऱ्या ग्राहकांना दरमहा १० रुपयांची सवलत देण्यात येणारअसल्याची माहीती वरिष्ठ महाप्रबंधक नितीन महाजन यांनी दिली.
    यासंदर्भात बाेलताना महाप्रबंधकांनी सांगितले की, जिल्ह्यातील ९० टक्के ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक इ-बिलासाठी नोंदणी केलेला आहे. ही स्वागतार्ह बाब असून उर्वरित ग्राहकांनीसुद्धा मोबाइल क्रमांक जोडून घ्यावा. तसेच ग्राहकांना बिलाची प्रत मिळवण्यासाठी इ-मेल आयडीची नोंदणी करून घ्यावी. इ-बिलासाठी ग्राहक मोबाइल नंबर किंवा इ-मेल आयडीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) वरिष्ठ महाप्रबंधक दूरसंचार कार्यालय, कॅनडा कॉर्नर येथील राजस्व (टी. आर. ए.) विभाग येथे किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात अथवा aoabhay777@gmail.com आणि aoruralpersuit@gmail.com या इ-मेल आयडीवर इ-मेल ही करता येणार अाहे. तसेच मोबाइल क्रमांक ८२७५८६४६१६ आणि ८२७५८६४६१७ या क्रमांकावर व्हाॅट्सअॅप संदेशाद्वारे आपला कार्यरत दूरध्वनी क्रमांकाशी सबंधित मोबाइल क्रमांक व इ-मेल आईडी सादर करू शकतात.
    प्रिंटिंगचा खर्च ग्राहकांनाच सवलत म्हणून देणार
    राज्यातील बीएसएनएल ग्राहकांना इ-बिल देण्याचा निर्णय राज्याचे मुख्य महाप्रबंधक पीयूष खरे यांनी घेतला अाहे. नाशिकमधील ग्राहकांसाठीचा छपाई खर्च व वितरण व्यवस्थेवर दरमहा सुमारे पाच लाख रुपये खर्च येत हाेता. या खर्चापाेटीच ग्राहकांना दरमहा १० रुपयांची सूट दिली जाणार अाहे. - नितीन महाजन, वरिष्ठ महाप्रबंधक, बीएसएनएल
    बिल न मिळाल्याच्या तक्रारी अापाेअाप संपुष्टात येणार
    इ-बिलाच्या याेजनेमुळे बिल मिळाले नसल्याची नेहमीची तक्रारही अापाेअाप संपुष्टात येणार अाहे. कारण ग्राहकांच्या इ-मेलवर बिल उपलब्ध हाेणार अाहे. तसेच पाेर्टलवर जाऊन त्यांना बिल घेता येणार अाहे. ज्या ग्राहकांना हिशेबासाठी बिल अावश्यक अाहे, अशा ग्राहकांनी बीएसएनएलच्या काउंटर जाऊन एसएमएस दाखविल्यानंतर त्यांना बिलाची प्रत काढता येईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३१९२८० वर संपर्क करावा, असे अावाहन वरिष्ठ महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले अाहे.
    Now BSNL will give E-Bill to customer

Post a Comment

 
Top