0
महाभारतामध्ये प्रभू श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, कोणत्या लोकांना मिळते सर्व सुख आणि कोणत्या कारणांमुळे व्यक्ती नेहमी

महाभारत युद्धापूर्वी प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता उपदेश दिला होता. गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्ण यांनी विविध अशा नीती सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केल्यास आजही व्यक्तीचे दुःख आणि सर्व शंका दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, श्रीकृष्णाने सांगितलेल्या अशाच 10 गोष्टी ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात...


1. जो व्यक्ती वेळोवेळी दान आणि तप करतो, नेहमी खरं बोलतो आणि स्वतःचे इंद्रिय वशमध्ये ठेवतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो


2. जो मनुष्य आई-वडिलांची सेवा करतो आणि भावंडांना सन्मान, प्रेमाची वागणूक देतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो.


3. जो व्यक्ती दररोज स्नान, दान, हवन, मंत्रोच्चारण आणि देवपूजन करतो त्याला निश्चितच जीवनातील सर्व सुख मिळतात आणि मोक्ष प्राप्त होतो.


4. भगवान विष्णू, एकादशी व्रत, गंगा नदी, तुळस, ब्राह्मण आणि गाय या 6 गोष्टीच या संसारातून मुक्ती देणारा मार्ग बानू शकतात. यामुळे या सर्वांची पूजा-अर्चना करावी.


5. एक पिंपळ, एक लिंब, एक वड, दहा चिंच, तीन बेल, तीन आवळ्याचे आणि पाच आंब्याचे झाड लावणाऱ्या व्यक्तीला कधीही नरकाचे तोंड पाहावे लागत नाही.


6. गोमूत्र, गोबर, गोदुग्ध, गोधुळी, गोक्षुर आणि हिरवेगार शेत फक्त पाहिल्याने पुण्य प्राप्त होते.


7. जो पुरुष आपल्या सर्व इच्छांचा त्याग करून, अहंकाररहित, क्रोधरहित आणि लालसारहित होतो, तोच शांतता आणि मोक्ष प्राप्त करतो.


8. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये संतुष्ट राहतो, ज्याचे मन सुख आणि दुःख दोन्हीमध्ये शांत राहते तसेच लाभ आणि हानी दोन्ही गोष्टींमध्ये एकसमान वागतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो.


9. जो व्यक्ती कोणासोबतही शत्रुत्व ठेवत आणि आणि कोणाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही अशा व्यक्तीला परमानंद प्राप्त होतो. कारण राग, द्वेषरहित मनुष्य प्रत्येक दुःखातून मुक्त होतो.


10. जे लोक हिंसा करतात, नास्तिक व्यक्तीच्या घरी जातात, नेहमी लालूच आणि मोहामध्ये अडकलेले असतात ते नरकात जातात. या सर्व कामापासून दूर राहणारे लोक स्वर्ग प्राप्त करतात.motivational quotes of krishna and life management tips

Post a Comment

 
Top