0
ट्रकचे टायर फाटल्यानंतर हा भीषण अपघात घडला.

  • अहमदाबाद - गुजरातच्या भचाऊ तालुक्यात भीषण अपघातामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले 10 जण एकाच कुटुंबातील असून इतर 5 जण जखमी आहेत. भचाऊ तालुक्यातील महामार्गावर एका भरधाव ट्रकचे टायर फुटले. यानंतर तो ट्रक दुभाजक तोडून दुसऱ्या दुसऱ्या बाजूला उलटला. याच दरम्यान समोरून येणारी कार त्यामागच्या ट्रकला जाऊन भिडली आणि दोन ट्रकमध्ये अडकून कारचा चेंदामेंदा झाला. लग्जरी कारमध्ये एकूणच 15 जण प्रवास करत होते.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उलटलेल्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मीठ भरलेले होते. तर कारमध्ये असलेले कुटुंब कबराऊ मोगलधाम येथून दर्शन करून परत येत होते. पीडित कुटुंब भुज येथील जेष्ठानगर परिसरातील रहिवासी आहे. या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांमध्ये अशोकभाई गिरधारीलाल कोट्टे (44), रिंबाबेन रमेश कोट्टिया (40), निर्मलबेन अशोकभाई कोटिया (38), निकिताबेन रमेश कोटिया (15), नंदिनीबेन अशोकभाई कोटिया (16), थिरुपीबेन दिनेशभाई कोटिया (16), मोहित रमेश कोटिया (10), भावना अशोकभाई कोटिया (12), हितेशभाई सुनीलभाई (20) आणि अर्जुन सुनीलभाई (18) यांचा समावेश आहे.car crushed between two speedy truck trailers in Gujarat, 10 of a family killed

Post a Comment

 
Top