0
शरीराने तीन, वाणीने चार आणि मनाने तीन असे एकूण दहा महापाप शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, कशाप्रकारे

एकदा युधिष्ठीरने पितामह भीष्म यांना मनुष्याने कोण-कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत असा प्रश्न विचारला. महाभारताच्या अनुशासन पर्वानुसार या प्रश्नाचे उत्तर देताना पितामह भीष्म यांनी सांगितले की, शरीराने तीन, वाणीने चार आणि मनाने तीन कामांचा त्याग करावा. अशाप्रकारे दहा महापाप सांगितले गेले आहेत.


1. शरीराने होणाऱ्या 3 महापापांमध्ये पहिले पाप पुरुषांसाठी परस्त्रीगमन आणि स्त्रियांसाठी परपुरुषगम आहे. आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी कोणत्याही परिस्थितीमध्ये शारीरिक संबंध ठेवणे, हे कर्म महापाप मानले गेले आहे.


2. शरीराने होणारे दुसरे पाप आहे चोरी. व्यक्तीने स्वतः कष्ट करून धन प्राप्त करावे. इतरांचे धन किंवा इतर वस्तू चोरी करणे पाप आहे.


3. शरीराने होणारे तिसरे पाप हिंसा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अनावश्यक रूपात हिंसा करणे पाप मानले गेले आहे.


4. वाणीने होणारे पहिले पाप व्यर्थ बडबड करणे आहे. दुसरे पाप निष्ठुर म्हणजेच कटू बोलणे. अशा गोष्टी ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाते.


5. एखाद्याची चहाडी करणे वाणीने होणारे तिसरे पाप आहे. वाणीने होणारे चौथे पाप खोटं बोलणे हे आहे.


6. मनाने होणाऱ्या तीन पापांमधील पहिले पाप म्हणजे इतरांचे धन हडपण्याचा विचार करणे. दुसरे पाप आहे मनात वैर भाव ठेवणे. सर्वांसोबत प्रेम भाव ठेवणे हाच आपला धर्म आहे.


7. मनाने होणारे तिसरे पाप आहे, कर्म फळावर विश्वास न ठेवणे. आपण देवाने दिलेल्या कर्म फळावर विश्वास न ठेवणे, हेसुद्धा एक पाप आहे.
mahapaap according to shastra

Post a Comment

 
Top