168 तासात झाला घटनेचा उलगडा, पोलिसांच्या 12 टीम्सने केले रात्रंदिवस काम
- आग्रा : लालऊ येथे झालेल्या दलित मुलीला जिवंत जाळल्याच्या घटनेचा पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुलीची हत्या बाहेरील व्यक्तीने नाही तर तिच्यात नात्यातील एकाने केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीवर एकतर्फी प्रेम झालेल्या योगेशने तिची हत्या केली आहे. त्यानंतर योगनेही आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुलगी अशरफी देवी इंटर कॉलेजमध्ये 10 वीच्या वर्गात शिकत होती. पोलिसांनी 168 तास रात्रंदिवस काम करून मंगळवारी मीडियासमोर या हत्याकांडचा खुलासा केला.असे आहे पूर्ण प्रकरण- 18 डिसेंबर रोजी आग्रामध्ये शिकणारी संजली आपल्या मैत्रीणींसोबत शाळेतून घरी जात होती. पण संजली काही कामानिमित्त एका दुकानावर थांबली त्यामुळे तिच्या मैत्रीणींपुढे निघून गेल्या या संधीचा फायदा घेत योगेश आणि त्याच्या 2 मित्रांनी संजलीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. तेथून जात असलेल्या स्कूल बस ड्रायव्हरला मुलीला पाहिले आणि आग विझवली. पण तोपर्यंत संजली 80 टक्के भाजली होती. तिला उपचारासाठी दिल्ली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. 19 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.एकतर्फी प्रेमात योगेशने प्राषण केले विष- योगेश संजलीच्या दूरच्या नातेवाईकाच मुलगा होता. दोघांमध्ये बहिण-भावाचे नाते होते. असे असूनही तो तिच्यावर प्रेम करत होता. घटनेच्या काही दिवसांनंतर त्यानेही विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी आढळली होती. पोलिसांना प्रेमपत्र आणि व्हाट्सअप चॅटच्या आधारे या प्रकरणाचा सुगावा लागला होता. योगेश 6 महिन्यांपासून या हत्याकांडाचे षडयंत्र रचत होता. मुलीने त्याला अनेकवेळा नकार दिला. पण तो ऐकायला तयार नव्हता.योगेशनेच रचले होते षडयंत्र- योगनेच या हत्येचे षडयंत्र रचले असल्याचे अटक झालेल्या दोन मुलांना सांगितले. घटनेवेळी दोन्ही आरोपी हेल्मेट घालून बाइक वर जात होते. योगेश त्यांच्या पाठीमागे जात होता. पोलिसांनी मुलांसोबत या प्रकरणात वापरलेल्या दोन बाइक्स ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय या घटनेमध्ये वापरण्यात आलेला लायटर, काही कपडे, हातमोजे आणि इतर सामान पोलिसांनी जप्त केले आहे.
Post a Comment