0
महाभारताचे रचनाकार आहेत वेदव्यास, त्यांनी सांगितले आहे की आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर आपण काय करावे

  • quotes of ved vyas mahabharata and life management tipsहिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथांपैकी एक महाभारत ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना महर्षी वेदव्यास यांनी केली होती. वेदव्यास यांनी महाभारताच्या माध्यमातून सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र सांगितले होते. या सूत्रांचा अवलंब केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. येथे जाणून घ्या, अशाच काही खास गोष्टी...

    > इच्छा पूर्ण होत नसतील तर समजूतदार व्यक्तीने शोक करू नये. फक्त कर्म करत राहावेत.

    > जो अधार्मिक काम करतो, निर्दोष लोकांना त्रास देतो, त्याचे आयुष्य, धन-संपत्ती, मान-सन्मान, पुण्य सर्वकाही नष्ट होते.

    > एखाद्याविषयी मनात क्रोध पाळण्यापेक्षा तो क्रोध लगेच प्रकट करणे चांगले आहे, जसे की क्षणात जळून राख होणे उशिरापर्यंत जळत राहण्यापेक्षा चांगले आहे.

    > अमृत आणि मृत्यू दोन्ही आपल्या शरीरात स्थित आहेत. मनुष्याला मोहापासून मृत्यू आणि सत्यापासून अमृताची प्राप्ती होते.

    > इतरांसाठीही अशी इच्छा ठेवा जी तुम्ही स्वतःसाठी ठेवता.

    > जो मनुष्य क्रोधीवर क्रोध न करता त्याला माफ करतो, तो स्वतःचे आणि क्रोध करणाऱ्या व्यक्तीचे महासंकटापासून रक्षण करतो. तो दोघांचेही रोग दूर करणारा चिकित्सक असतो.

    > जेथे कृष्ण आहे तेथे धर्म आहे आणि जेथे धर्म आहे तेथे जय आहे.

    > ज्या व्यक्तीच्या मनात संशय असतो त्याला या लोकात आणि परलोकातही सुख मिळत नाही.

Post a Comment

 
Top