0
पुणे- रोमानिया येथे नुकत्याच झालेल्या 22 व्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात (इंटरनॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल) पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिज इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) दिग्दर्शन विभागाचा विद्यार्थी रमेश होलबोले याचा माहितीपट 'आगासवाडी'ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे रमेश होलबोले हा मूळचा नांदेड येथील आहे.
रमेशने दुष्काळी भागातील जगण्याचा संघर्ष जवळून अनुभवला आहे. त्यामुळे त्याने आपल्या माहितीपटासाठी सातारा जिल्ह्यातील 'आगासवाडी' या दुष्काळी गावाची निवड केल्याचे रमेश याने 'दिव्य मराठी'शी बोलताना रमेश याने सांगितले.
रमेश याने सांगितले की, एफटीआयआयच्या प्रशासनाने अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून दिग्दर्श विभागाच्या दहा विद्यार्थ्यांन औरंगाबाद आणि सातारा या दोन जिल्ह्यात प्रत्यक्ष भेट देऊन आवडीनुसार विषय निवडून संशोधनपर माहितीपटाची निर्मिती करण्यास सांगितले होते. तेव्हा रमेश याला लेखक आनंद विंगकर यांचे पुस्तक 'माणदेश: दरसाल दुष्काळ' आठवले. तो एमए (मराठी) करत असताना हे पुस्तक वाचले होते. विंगकर यांनी आपल्या पुस्तकात सातार्‍यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'आगासवाडी' या गावाविषयी लिहिले होते. आगासवाडी हे माणदेशातील 12 महिने दुष्काळाला पुगलेल्या अनेक खेड्यागावांपैकी एक गाव आहे. जवळपास 80 लोकवस्तीचे हे गाव आहे. रमेशने आगासवाडक्ष या दुष्काळी गावाची आपल्या माहितीपटासाठी निवड केली.
रमेशने 'आगासवाडी' या दुष्काळी गावात तीन महिने राहून संपूर्ण गावाची पाहाणी केली. तेथील संपूर्ण परिस्थिती त्याने आपल्या माहितीपटात चित्रबद्ध केली. 'आगासवाडी' हेच आपल्या माहितीपटाचे शीर्षक ठेऊन रमेश याने गावाची कहाणी मांडली.
सर्व रस्ते आगासवाडीतच थांबतात..
दुष्काळाचे प्रतिनिधित्त्व करणारे आगासवाडी हे गाव सातार्‍यातील माण तालुक्यातील डोंगरावर वसले आहे. आगसवाडीत येणार सर्व रस्ते येथे थांबतात. त्यात दळणवळणाच्या साधनांचा अभाव, चौथीपर्यंत शाळा, त्यात विद्यार्थी नाहीत. प्रचंड दुष्काळामुळे गावातील बहुतांश लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यामुळे गावात केवळ वयोवृद्ध नागरिक जास्त दिसतात.
पवनचक्क्यांसाठी जमिनी दिल्या पण रोजगार मिळाला नाही..
आगासवाडीत खासगी कंपन्यांनी पवनचक्क्या उभारल्या आहेत. त्यासाठी कंपन्यांनी येथील लोकांच्या जमिनी घेतल्या आहेत. त्यांना रोजगार देतो, असे सांगून त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे दुष्काळासोबत बेरोजगारी ही एक प्रमुख समस्या आहे.
10 वर्षांपासून विहिर खोदतोय भीमराव!
आगासवाडीच्या दुष्काळासह गावाच्या, तिथल्या लोकांच्या समस्या आणि त्याविरुद्ध त्यांचा सुरु असणारा अविरत संघर्ष रमेश याने आपल्या माहितीपटात डोळसपणे मांडला आहे. रमेशच्या माहितीपटाच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती आहे. भीमराव जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे. 50 वर्षीय भीवराव हे गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मागील दहा वर्षांपासून विहीर खोदत आहे.
रमेश याने आगासवाडी या गावाच्या दुष्काळाची कथाच आपल्या माहितीपटातून जगासमोर आणली आहे. याच माहितीपटाने रोमानियातील 22 व्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हमध्ये प्रथम क्रमांकाचे पॉल कॅलिनेस्क्यू अॅवार्ड पटकावला आहे.
आगासवाडीतील लोकांसोबत जुळले भावनिक नाते...
रमेशने आपल्या माहितीपटासाठी 'आगासवाडी' या दुष्काळी गावाची निवड केली. नंतर तो तब्बल तीन महिने गावात राहिला. गावाची पाहाणी करून त्याने संपूर्ण परिस्थिती त्याने माहितीपटात चित्रबद्ध केली. यादरम्यान, गावातील लोकांसोबत भावनिक नाते जुळल्याचे रमेशने सांगितले. चित्रिकरण झाल्यानंतर संपूर्ण गावकरी रमेशला सोडण्यासाठी स्टॉपपर्यंत आले होते. आजही गावातील लोकांचे फोन रमेशला येतात. आगासवाडीत जावून आपला माहितीपट गावकर्‍यांना मोठ्या पडद्यावर दाखवणार असल्याचे रमेशने सांगितले आहे.
FTII Ramesh Holboles Documentary of Aagaswadi to Top in International Student Flim Festival

Post a Comment

 
Top