0
विल्यम शेक्सपिअरने सांगितले आहे की बहुतांश लोक एका सवयीमुळे नेहमी अडचणीत राहतात, लवकर ही सवय सोडून द्यावी...

जगप्रसिद्ध कवी, नाटककार, साहित्यकार विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म 26 एप्रिल 1954 मध्ये इंग्लंड देशात झाला. शेक्सपिअर यांचे वयाच्या 18 व्या वर्षीच लग्न झाले होते. यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा होता. आजही त्यांचे विचार यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतात. येथे जाणून घ्या, विलियम शेक्सपिअर यांच्या अशा काही गोष्टी, ज्यामुळे तुमच्या विविध अडचणी दूर होऊ शकतात...

1. ग्रह-ताऱ्यांमध्ये एवढी शक्ती नसते की, ते आपल्या जीवनाचा निर्णय करू शकतील याउलट आपले भाग्य आपल्याच हातामध्ये असते.

2. नावामध्ये काय ठेवले आहे, आपण गुलाबाचा कोणत्याही नावाने उच्चार केला तरी त्याचा सुगंध आहे तसाच राहणार आहे.

3. स्वतःसाठी इतरांच्या मदतीची अपेक्षा ठेवणे हेच सर्वात मोठे अडचणीचे मूळ आहे.

4. रिकामे भांडे जास्त आवाज करते म्हणजेच ज्यांच्याकडे ज्ञान नसते तेच जास्त ओरडतात.

5. शेवट चांगला तर सर्वकाही चांगलेच असते.

6. एक मूर्ख व्यक्ती स्वतःला बुद्धिमान समजतो परंतु एक बुद्धिमान व्यक्ती स्वतःला मूर्ख समजतो. दोघांमध्ये हाच फरक आहे.

7. सर्वात महत्त्वाचे हे आहे की, आपण स्वतःह योग्य राहणे. आपण योग्य असल्यास हीसुद्धा समाजाची एक सेवा आहे.

8. आपण जे बोलतो ते अवश्य करावे. आपल्या मतावर ठाम राहावे.

9. आपल्या जीवनात काहीही चांगले आणि वाईट घडत नाही, फक्त आपले विचारच जीवनाला चांगले किंवा वाईट बनवतात.

10. एक मिनिट उशिरा पोहोचण्यापेक्षा आपण तीन तास आधीच पोहोचावे.William Shakespeare quotes for happy life

Post a Comment

 
Top