0
गरोदरपणाच्या बारा महिन्यांनंतरही गांधारी मुलांना जन्म देऊ शकली नाही, गांधारीला वाटले मुलं जीवंत आहे की नाही, असे का होत

महाभारतानुसार राजा धृतराष्ट्र यांना 100 पुत्र होते, हे सर्वांनाच माहिती असेल परंतु यांचा जन्म कसा झाला आणि यांची नावे काय होती. हे फार कमी लोकांना माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती देत आहोत.


एके दिवशी महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खुप सेवा केली. महर्षी व्यास यांनी गांधारीवर प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला शंभर पुत्र होतील असे वरदान दिले. काही काळानंतर गांधारी गरोदर राहिली. महिने जात होते, नऊ महिन्यांचे दहा महिने झाले, अकरा महिने झाले परंतु काहीच झाले नाही. गांधारी अस्वस्थ होत होती. बारा महिन्यांनंतरही गांधारी मुलांना जन्म देऊ शकत नव्हती. गांधारीला वाटले मुलं जीवंत आहे की नाही, असे का होत आहे. शेवटी हताश होऊन तिने पोटावर वार केले आणि गर्भ पाडला. तिच्या पोटातून लोखंडासमान मांसाचा एक पिंड बाहेर पडला.


महर्षी व्यास यांनी ही पुर्ण घटना दिव्य दृष्टीने पाहिली. यानंतर ते गांधारी जवळ गेले आणि म्हणाले की, मासाचे ते पिंड माझ्याकडे घेऊ ये. त्यांनी गांधारीला सांगितले की, तु तात्काळ शंभर कुंड तयार करुन त्यांना तुपाने भरुन टाक आणि दोन वर्षांसाठी ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था कर. गांधारीच्या आज्ञेनुसार सेवकांनी सर्व तयारी केली. महर्षी व्यास यांनी त्या पिंडावर जल टाकले तेव्हा त्याचे एकशे एक तुकडे झाले. जे दोन वर्षांसाठी एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यांच मांसाच्या पिंडामधून शंभर कौरव आणि एका कन्येचा जन्म झाला.


1. दुर्योधन, 2. दु:शासन, 3. दुस्सह, 4. दुश्शल, 5. जलसंध, 6. सम, 7. सह, 8. विंद, 9. अनुविंद, 10. दुद्र्धर्ष, 11. सुबाहु, 12. दुष्प्रधर्षण, 13. दुर्मुर्षण, 14. दुर्मुख, 15. दुष्कर्ण, 16. कर्ण, 17. विविंशति, 18. विकर्ण, 19. शल, 20. सत्व
gandhari 100 son birth story in marathi

Post a Comment

 
Top