0
कुत्र्याने मालकाला शोधत शोधत ९ दिवसांत 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

वॉशिंग्टन - कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण अमेरिकेच्या एका कुत्र्याने हे चुकीचे ठरवले आहे. न्यू मॅक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका कुत्र्याने त्याच्या मालकाचा शोध घेत 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि तो मालक भेटताच कुत्रा त्याला चावला. पण कुत्र्याच्या चावण्यामागचे कारण समजल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल.


9 दिवसांत केला प्रवास 
कुत्र्याने मालकाला शोधत शोधत ९ दिवसांत 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. कुत्र्याच्या मालकाचे नाव सेंटियागो मार्टनीज असल्याचे सांगण्यात आले आहे. हा व्यक्ती दरवर्षी सुटीसाठी अल्बयूक्रेनला जात होता. कुत्रा तोपर्यंत लहान होता तोपर्यंत तो कुत्र्यालाल बरोबर घेऊन जात होता. पण यावेळी तो कुत्र्याला सोबत घेऊन गेला नव्हता.

कुत्र्याने घेतला बदला 
- सेंटियागोने कधी विचारही केला नव्हता की, त्याचा कुत्रा त्याला याची शिक्षा देईल. कुत्रा आपल्याला शोधत तो सुटीवर असलेल्या ठिकाणापर्यंत समुद्र किनाऱ्यावर येऊन पोहोचेल असेही त्याला वाटले नव्हते. 
- सेंटियागो कुत्र्याला पाहून थक्क झाला. त्याने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण कुत्रा प्रचंड रागामध्ये होता. मिछी मारताच तो मालकाला चावला. नंतर तो मालकाच्या चारही बाजुला फिरून त्याला चाटू लागला.Doggy took revenge from his owner by biting him after travelling 100 km

Post a comment

 
Top