0
चारदिवसीय सराव सामना ड्रॉ भारताच्या दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा
सिडनी - भारत अाणि यजमान क्रिकेट अाॅस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यातील चारदिवसीय सराव सामना रविवारी ड्राॅ झाला. यजमानांनी घरच्या मैदानावर सरस खेळी करताना पहिल्या डावात ५४४ धावांचा डाेंगर रचला. त्यानंतर प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या डावामध्ये २ गड्यांच्या माेबदल्यात २११ धावा काढल्या. यासह या सराव सामना अनिर्णीत राहिला. भारताकडून मुरली विजयने (१२९) शानदार शतकी खेळी केली . तसेच लाेकेश राहुलने ६२ धावांचे याेगदान दिले. कसाेटी मालिकेच्या तयारीसाठी या एकमेव सराव सामन्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते.

दुय्यम दर्जाच्या या टीमच्या अाव्हानाचा सामना करण्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीला स्वत: गाेलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागले. तसेच त्याने यासाठी १० गाेलंदाजांचे नशीब अाजमावले. मात्र, याच यजमानांनी शाॅर्ट (७४), ब्रायंट (६२), हार्डीच्या (८६) अर्धशतकापाठाेपाठ निएल्सनने (१००) केलेल्या शतकी खेळीच्या बळावर ५४४ धावांचा माेठी खेळी केली. या फलंदाजांनी सराव सामन्यात भारताच्या गाेलंदाजांची चांगलीच दमछाक केली. भारताकडून पहिल्या डावात शमीने ३, अश्विनने २ बळी घेतले. तसेच उमेश यादवसह ईशांत शर्मा, विराट काेहली व बुमराहने प्रत्येकी १ गडी बाद केला.

दाेन्ही सलामीवीर फाॅर्मात
सलगच्या अपयशातून सावरताना लाेकेश राहुलने दुसऱ्या डावात शानदार खेळी केली. यासह त्याला अाता फाॅर्म गवसला अाहे. त्याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला पहिल्या डावात सुमार खेळीचा फटका बसला. त्यामुळे त्याला माेठी खेळी करता अाली नाही. मात्र, यातून सावरताना त्याने दुसऱ्या डावात ९८ चेंडूंमध्ये ६२ धावा काढल्या. यात ८ चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. याशिवाय त्याने मुरली विजयसाेबत १०९ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. दरम्यान, फाॅर्मात अालेल्या मुरली विजयने शानदार शतक ठाेकले. त्याने १३२ चेंडूंमध्ये १६ चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे १२९ धावांची खेळी केली.

गुुरुवारपासून कसाेटी
येत्या ६ डिसेंबर, गुरुवारपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. मात्र, मालिकेतील सलामीच्या कसाेटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी खेळू शकणार नाही. त्याला सराव सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे ताे बाहेर अाहे.
News about india vs australia ca elevan practise match

Post a Comment

 
Top