0
एकाची पत्नी आहे इंटेरियर डिझायनर तर एकाची आहे लेखिका...

मुंबईः छोट्या पडद्यावर 'गजोधर' या नावाने प्रसिद्ध असलेला विनोदवीर राजू श्रीवास्तवचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूर येथे जन्मलेल्या राजूचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे. राजूचे वडील रमेश चंद्र श्रीवास्तव कानपूर येथील प्रसिद्ध कवी आहेत. त्यांना बलाई काका या नावानेसुद्धा ओळखले जाते. राजू विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव शिखा आहे. शिखा कायम लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. टीव्ही इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत असे अनेक स्टार आहे, ज्यांनी विनोदवीराच्या रुपात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये राजू श्रीवास्तव, सुनील ग्रोवर, राजपाल यादव अशा नामांकित नावांचा समावेश आहे, पण या विनोदवीरांच्या पत्नीला त्यांचे चाहते ओळकत नाहीत. या विनोदवीरांच्या पत्नी लाइमलाइटपासून कायम दूर राहणे पसंत करतात. आज या पॅकेजमधून आम्ही तुमची ओळख करुन देतोय 10 विनोदवीरांच्या पत्नींशी...
1. राजू श्रीवास्तव आणि शिखा
राजू श्रीवास्तव विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव शिखा आहे. या दाम्पत्याला अंतरा ही एक मुलगी आणि आयुष्मान हा एक मुलगा आहे. राजूची पत्नी शिखा कायम लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. राजूने टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'तेजाब' (1988), 'मैंने प्यार किया' (1989), 'बाजीगर' (1993), 'मैं प्रेम की दीवानी हूं' (2003), 'बॉम्बे टू गोवा' (2007) सह अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. तर छोट्या पडद्यावर त्याने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'शक्तिमान', 'राजू हाजिर हो', 'कॉमेडी का महा मुकाबला', 'कॉमेडी सर्कस', 'देख भाई देख' सह अनेक शोज केले.
2. सुनील पाल आणि सरिता
सुनील पालच्या पत्नीने नाव सरिता आहे. सरितादेखील पेज थ्री पार्टीज किंवा इव्हेंट्समध्ये दिसत नसते. सुनील पालने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' (2005) शिवाय आणखी काही कॉमेडी शोजमध्ये काम केले. शिवाय 'हम तुम' (2004), 'फिर हेरा फेरी' (2006), 'अपना सपना मनी मनी' (2006), 'मैं हूं रजनीकांत' (2015) या चित्रपटांमधून तो मोठ्या पडद्यावर झळकला.
3. किकू शारदा आणि प्रियांका
किकू आणि प्रियांका यांनी 2003 मध्ये लग्न केले होते. प्रियांका सहसा लाइमलाइटपासून दूर असते. पण 'नच बलिए सीजन 6'मध्ये ती किकूसोबत झळकली होती. किकून छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. 'डरना मना है' (2003), 'फिर हेरा फेरी' (2006), 'धमाल' (2007), 'रेस' (2008), 'नो प्रॉब्लम' (2010), 'हॅप्पी न्यू ईयर' (2014) सह अनके गाजलेले चित्रपट त्याने केले आहेत. तर 'हातिम' (2004), 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो' (2007), 'एफआईआर' (2015), 'भूतवाला सीरियल' (2009), 'कॉमेडी सर्कस के अजूबे' (2013), 'अकबर बीरबल' (2016) हे त्याचे गाजलेले टीव्ही शोज आहेत.
Raju Shrivastava To Sunil Grover, Bollywood & TV Comedians With Wife

Post a Comment

 
Top