नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अचानक घट झाल्याने सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 72.53 रुपये आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये 17 ऑक्टोबरपासून आतापर्यंत प्रतिलीटरमागे 10 रुपये 30 पैसे घट झाली आहे. चेन्नईमध्ये प्रतिलीटर पेट्रोलमागे 10 रुपये आणि मुंबईमध्ये 9 रुपये 99 पैशांची घट झाली आहे.
शनिवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट
गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने सलग 10 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटरमागे 6 रुपये 54 पैसे आणि डिझेल 6 रुपये 43 पैशांनी स्वस्त झाले आहे. तेल वितरण कंपन्यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांत प्रतिलीटरमागे 34 पैशांची घट केली आहे. तर हेच दर कोलकाता शहरात 33 पैसे आणि चेन्नईत 36 पैशांनी कमी झाले आहे. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरांत प्रतिलीटरमागे दिल्लीत 37 पैसे, कोलकाता शहरात 49 पैसे आणि मुंबईमध्ये 39 पैशांची कपात झाली आहे.

Post a Comment