0
रोजगार मिळाल्यानंतर सुरू होईल अकाउंट

नवी दिल्‍ली- लेबर अँड इम्प्लॉयमेंट मिनिस्ट्रीने अधिसूचना जारी केले आहे. त्यात सांगितले की, नोकरी गेल्याच्या 1 महिन्यात PF च्या 75 टक्के पैसे काढता येतील आणि तुमचे अकाउंटही चालु राहील, आणि उर्वरीत 25 टक्के रक्कम पुढील दोन महिन्यात काढता येईल. याआधी दोन महिन्यात तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे मिळायचे आणि तुमचे अकाउंट बंद व्हायचे.


EPFO ने घेतला हा निर्णय
जूनमध्ये झालेल्या इम्‍प्‍लॉयज प्रोविडेंड फंड ऑर्गनाइजेशन (EPFO) च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्‍टीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. 6 डिसेंबरला लेबर मिनिस्ट्रीने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.


रोजगार मिळाल्यानंतर सुरू होईल अकाउंट
मिनिस्‍टरने सांगितले की, 75 टक्के पैसे काढल्यानंतर, ईपीएफओमध्ये अकाउंट असणे ही एक मोठी सुविधा आहे. या अकाउंटला नोकरी मिळाल्यानंतर परत सुरू करता येईल.
rule of withdraw money from PF

Post a comment

 
Top