0

वर्चस्व- अभिजितची सेमीफायनलमध्ये रवींद्रवर मात; बुलडाण्याचा बालारफी अंतिम फेरीत

जालना- गत चॅम्पियन अभिजीत कटकेने आपले किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवताना शनिवारी ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल गाठली.त्याने केसरीच्या गादी विभागातील उपांत्य सामन्यात साेलापूरच्या रवींद्रला चीतपट केले. त्याने १ मिनिट १० सेकंदात ६-० अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला.यासह त्याने ४ मिनिट ५० सेंकद शिल्लक असतानाच विजय निश्चित करून अंतिम फेरीचा पल्ला गाठला. त्याने आपल्या करिअरमध्ये सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली. त्याने गत वर्षी २०१७ भुगाव येथे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला हाेता. त्याचा यंदाच्या स्पर्धेतील हा सलग सहावा विजय ठरला.

आज रविवारी महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी अभिजीत कटके आणि बुलढाण्याचा बालारफी शेख यांच्यात झुंज रंगणार आहे. संध्याकाळी हा अंतिम सामना हाेईल. या स्पर्धेतील विजेत्या मल्लाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा आणि स्मृतीचिन्ह देऊन गाैरव करण्यात येईल. या साेहळ्याकडे आता तमाम चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या कुस्तीतून महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरणार आहे

बालारफीच्या वडिलांना आनंदाश्रू आवरेना!
बालारफी शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल गाठल्यानंतर त्याचे ६५ वर्षीय आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले हाेते. झालेला हा आनंद त्यांना शब्दात सांगता येईना. अत्यंत भावुक हाेऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला.

अनुभवात बालारफी वरचढ; अभिजितची आज कसरत
पुण्यातील नव्या दमाच्या २१ वर्षीय अभिजितसमाेेर आता फायनलमध्ये बलाढ्य आणि अनुभवी बालारफी शेखचे आव्हान असेल. त्यामुळे त्याची विजयासाठी कसरत हाेण्याची शक्यता आहे. माती विभागात आतापर्यंत बालारफीने तीन वेळा फायनलपर्यंतचा पल्ला गाठला. त्यामुळे ताे कसलेला मल्ला मानला जाताे.

तिसऱ्या प्रयत्नानंतर बालारफीने गाठली केसरीची फायनल 
साेलापूर येथे राहणारा मल्ल बालारफी शेख हा बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताे. त्याने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल गाठली. त्याने माती विभागातून हा पल्ला गाठला. यापूर्वी दाेन वेळा त्याला माती विभागामध्ये अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, त्याने जिद्द साेडली नाही. त्यामुळेच त्याला अंतिम फेरी गाठता आला.

अभिजित कटकेचा विजयी षटकार
पुण्याच्या अभिजितने शनिवारी स्पर्धेत विजयाचा षटकार मारला. त्याने सलामीला कट्टर प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेचा पराभव करून किताबाच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. याच विजयाने जबरदस्त आत्मविश्वास उंचावलेल्या अभिजितने त्यानंतर सामन्यात सलग बाजी मारली. 

वर्चस्व अबाधित ठेवणार : अभिजित
उपांत्य सामन्याच्या विजयाने माझ्याकडून चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मी किताबाचे माझे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी प्रतिक्रिया अभिजितने विजयानंतर दिली.

स्पर्धेला गालबोट लावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई : खोतकर
केसरी स्पर्धेत काही मंडळीकडून विनाकारण वाद घडवून स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्पर्धेला गालबोट लावणाऱ्यांची गय केली जाणार नाही व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. खेळाडंूची काही तक्रार असल्यास त्यांनी पंचाकडे किंवा आयोजकांकडे रीतसर आक्षेप नोंदवावा, असे स्पर्धा समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले.

औरंगाबादचा शकील हरला
पुण्याच्या साईनाथ रानवडेने सांगलीच्या संदीप मोटे याला १०-० असे गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. साताऱ्याच्या नीलेश लोखंडे याने औरंगाबादच्या शकील पठाण याला ८-० ने हरवले. पुण्याच्या तानाजी झुजुरके याने वाशीमच्या सुनील शेतवतकर याला ३-२ ने तर रत्नागिरीच्या संतोष दोरवड याने धुळ्याच्या सुनेंद्र खांडेकर याला ५-२ ने बाद केले.

आज बालारफी व अभिजित फायनल
गतविजेता अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बालारफी शेख यांच्यात आज रविवारी ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फायनल मुकाबला रंगणार आहे. आज हे दाेघेही किताबासाठी संध्याकाळी समाेरासमाेर असतील. अभिजितने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे आत या लढतीत बाजी मारणारा मल्ल आता केसरीच्या बहुमानाचा मानकरी ठरणार आहे. यातूनच आता या कुस्तीकडे चाहत्यांची नजर लागलेली आहे.

बालारफी ५-० ने विजयी :

बुलडाण्याच्या बालारफी शेखने शनिवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याने माती विभागाच्या उपांत्य सामन्यात दावेदार मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या संताेष दाेरवडला पराभवाची धूळ चारली. बालारफीने संतोषला ५-० अशा फरकाने पराभूत केले. यासह त्याने अंतिम फेरी गाठली. विजेत्या मल्लाला मामासाहेब मोहोळ ही मानाची गदा मिळेल.
News about Maharashtra Wrestling Competition

Post a Comment

 
Top