0

       Wifi, Bluetooth आणि DTS-HD Dolby Audio सारखे आहेत फीचर्स, पुढीलवर्षी भारतात लॉन्च होण्याची शक्यता

                                                                                                                                   बिझनेस डेस्क - चिनी कंपनी शाओमी मोबाईल क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर आता टीव्ही मार्केटमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. कंपनीने चीनच्या मार्केटमध्ये विविध फीचर्ससह 75 इंची स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. Mi TV 4S या सीरीजचा हा टीव्ही आहे. यामध्ये प्रीमियम मेटल बॉडी, 4K स्क्रीन सोबत व्हॉईस रेकग्निशन आणि यूजर इंटरफेस सारखे फीचर्स दिले आहेत. 75 इंची Mi TV 4S चा डिस्‍प्‍ले HDR रेडी आहे. यामध्ये 64 बिट A53 क्वाड कोर प्रोसेसरसह 2GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज दिले आहे.

Xiaomi Mi TV 4S चे फीचर्स

Wifi, Bluetooth आणि DTS-HD Dolby Audio सारखे आहेत फीचर्स, पुढीलवर्षी भारतात लॉन्च होण्याची शक्यता> या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लुटूथ आणि DTS-HD Dolby Audio सारखे फीचर्स दिले आहेत. 75-Inch Mi TV 4S शाओमीच्या पॅचवॉल इंटरफेससोबत येतो. यामध्ये व्हॉईस रेकग्निशन फीचर देण्यात आले आहे. टीव्हीसोबत येणारा रिमोट अगदी सोपा असून त्यातील बटणची संख्याही कमी आहे.    

      • किती असणार किंमत
        शाओमीने 75 इंचच्या 4K टीव्हीला 7,999 युआन (जवळपास 82,100 रूपये) किमतीत लॉन्च केले आहे. पण हा टीव्ही भारतीय बाजारपेठेत कधी येणार यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. तरीही, शाओमी आपल्या या नव्या टीव्हीला पुढील वर्षी भारतात लॉन्च करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.   
            • xiaomi 75 inch mi tv 4s launched know all about features and price
      •                          

                                                                                                                    


Post a Comment

 
Top