- जलसंपदा विभागाच्या ११ नोव्हेंबर २००५ रोजीच्या नोटिसीमध्ये प्रतिवादी क्रमांक ७ (अजित पवार) यांनी ‘विदर्भातील प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी तत्परतेने निर्णय होणे आवश्यक असल्याने महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी सदरच्या धारिका (फाइल्स) अध्यक्ष (मंत्री) यांच्याकडे सरळ पाठवाव्यात,’ असे निर्देश दिले होते. हे आदेश नियमबाह्य असल्याचे तपासात आढळून आल्याचे एसीबीने शपथपत्रात म्हटले आहे.भोपाळ / ऐझॉल - मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. या दरम्यान एकट्या मध्य प्रदेशातच तब्बल 100 हून अधिक ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे, राजधानी भोपाळच्या इमली आणि शाहपुरा येथे मतदानाला 20 मिनिटे उशीराने मतदान सुरू झाले. तर सतना भिंड, ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन आणि खरगोनच्या अनेक ठिकाणी मतदानाला अर्धा तास विलंब झाला. कुठल्याही ठिकाणी ईव्हीएम बिघडल्यास 30 मिनिटांच्या आत ते दुरुस्त केले जात आहे असा दावा राज्य निवडणूक आयुक्त बीएल कांताराव यांनी केला आहे.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी येथे मतदान केले. मत टाकण्यापूर्वी त्यांनी नर्मदा नदी आणि कुलदेवीच्या मंदिरात पूजा-अर्चना केली. सोबतच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कमलनाथ यांनी छिंदवाडा येथील हनुमान मंदिरात आरती केली. त्यानंतर मतदानाचा हक्का बजावला. तर दुसरीकडे मिझोरमच्या 40 विधानसभा जागांसाठी देखील मतदान झाले. यात सकाळी 9 वाजेपर्यंत 15% मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीचे निकाल 11 डिसेंबर रोजी घोषित केले जाणार आहेत.
-
-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment