0
 • Google's crackdown captcha ends: New ReCAPTCHA V-3 Code applicable from Saturday- तुम्ही रोबोट आहात की मनुष्य, हे ठरवण्यासाठी गुगल कंपनी युजर्ससाठी कॅप्चा कोडचा वापर करत असते. मात्र हा वैताग शनिवारपासून संपुष्टात आला आहे. हा कोड लागू केल्यापासून गुगलचा प्रचंड वेळ वाया जात होता. या काेडच्या माध्यमातून तुम्ही रोबोट आहात की मनुष्य, हे गुगल ठरवत हाेती. मात्र आता कंपनीने म्हणणे आहे की रोबोट तर कॅप्चा कोड वाचूच शकत नाहीत. यामुळे आता अंकांच्या आधारावर रिकॅप्चा व्ही-३ कोड लागू केला जात आहे. यात युजर्सवर वेळखाऊ कोड टाइप करण्याचा वैताग येणार नाही.


  गुगलमध्ये आधी कॅप्चा कोडचे आडवे-तिरप्या अक्षरांचे फॉरमॅट किंवा एमपीथ्री व्हाइस रेकाॅर्डिंगचे. सॉफ्टवेअर प्रोग्राम असलेले हे कॅप्चा कोड रोबोट टाइप करू शकत नाही आणि ते समजूही शकत नाहीत. म्हणजेच तुम्ही रोबोट आहात की मनुष्य हे गुगलला समजून जायचे. हीच कारणे लक्षात घेऊन गुगलने शनिवारपासून नवीन कॅप्चा सिस्टिम लागू केली आहे. ते वेबसाइटवर बॅकग्राउंडमध्ये ०.१ ते १ पर्यंतचे स्कोअर दाखवेल. यात ०.१ हा वाईट तर १ हा चांगला स्कोअर असेल.

  या प्रक्रियेमुळे वेबसाइटवर पुढे जाण्यास मदत मिळेल. तसेच अनेक वेळा ब्राउजरला व्हेरिफाय करण्याची गरज भासणार नाही. हा नवा कोड सॅन फ्रान्सिस्कोच्या कंपनीने तयार केला आहे.
  सोपे झाले व्हेरिफिकेशन : तीन स्टेपवर काम करणार रिकॅप्चा व्ही-३ कोड
  पहिला : सुरुवातीला हे ठरवले जाऊ शकते की युजरला आधी जाऊ द्यावे का. किंवा तेव्हा त्याच्या आणखी व्हेरिफिकेशनची गरज आहे. उदा. दोन फॅक्टर्सचे अॅथेन्टिफिकेशन आणि फोन व्हेरिफिकेशन.
  दुसरे : तुम्ही स्वत:च्या सिग्नलशी स्कोअरला जोडू शकतात, जेथे रिकॅप्चा पोहोचू शकत नाही. उदा. युजर प्रोफाइल किंवा ट्रॅन्झॅक्शनचा इतिहास.
  तिसरा : तुम्ही रिकॅप्चा स्कोअरला मशीन लर्निंग मॉडेलला ट्रेंड करण्यासाठी एक सिग्नल म्हणून वापरू शकतात. यामुळे छेडखानी राेखता येईल

Post a Comment

 
Top