प्रियांकाच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत निकने डिनरला जात Thanksgiving party सेलिब्रेट केली. प्रियांकानेच या पार्टीचा फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत प्रियांकाचे भले मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे. ठळक मुद्दे
निक काल भारतात आला असून प्रियांकाने निकसोबतचा एक खूपच क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि तुझे घरी स्वागत आहे असे लिहिले आहे.प्रियांकाच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत निकने डिनरला जात Thanksgiving party सेलिब्रेट केली. प्रियांकानेच या पार्टीचा फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत प्रियांकाचे भले मोठे कुटुंब आपल्याला पाहायला मिळत आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नानंतर आता चर्चा रंगली आहे ती प्रियांका चोप्राच्या लग्नाची. दीपिका आणि रणवीर यांनी इटलीत जाऊन लग्न करण्यास पसंती दिली तर प्रियांका भारतात लग्न करणार आहे. प्रियांकाचे लग्न २ डिसेंबरला असून लग्नापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. प्रियांका तिचा प्रियकर निक जोनाससोबत राजस्थानधील उमेद भवन येथे लग्न करणार आहे.
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या पाच दिवसांमध्ये निक-प्रियांकाचा विवाहसोहळा रंगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निक दोन दिवसांपूर्वी भारताच्या दिशेने रवाना झाला होता. निकनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली होती. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात म्हटले होते की, न्यूयॉर्क मी लवकरच परतणार आहे. तो आता भारतात आला असून प्रियांकानेच इन्स्टाग्राम द्वारे तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. निक काल भारतात आला असून प्रियांकाने निकसोबतचा एक खूपच क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि तुझे घरी स्वागत आहे असे लिहिले आहे
.

Post a Comment