नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते एन. चंद्रबाबू नायडू यांनी गुरुवारी काँग्रेससोबत आघाडी जाहीर केली. तेदेप नेत्यांच्या शिष्टमंळासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर दोघांनी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली. या आघाडीचा मूळ हेतू भाजपला पराभूत करणे आहे असे राहुल गांधींनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांना व्यापक आघाडी आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. भूतकाळ विसरून आपण भाजपला पराभूत करण्याच्या हेतूने एकत्रित येत आहोत. सोबतच, भूतकाळाचा विचार न करता आता फक्त भविष्याचा विचार करणार आहोत असेही राहुल म्हणाले आहेत.
नुकतेच काँग्रेस नेते वीरप्पा मोइली यांनी तेदेप नेते नायडू यांना यूपीए आघाडीत सामिल होण्याचे निमंत्रण दिले होते. नायडू यांनी यांनी मार्चमध्ये एनडीएला रामराम ठोकला. यूपीएसोबत आघाडीला व्यापक स्वरुप देण्यासाठी नायडू यांनी आपल्या शिष्टमंडळासह केवळ राहुल गांधीच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार आणि हुर्रियत काँग्रेसचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्याही भेटी घेऊन चर्चा केली.काँग्रेस विरोधक म्हणून ओळखला जाणारा तेदेपे आता यूपीएत
तेलुगू देसम पक्ष हा मुळात काँग्रेस विरोधी गटातील पक्ष म्हणूनच ओळखला जातो. राज्यातील निवडणूक असो वा केंद्रात तेदेपने नेहमीच काँग्रेसला विरोध केला. 90 च्या दशकात या पक्षाने डाव्यांसोबत आघाडी केली होती. तर 1999 आणि 2004 सह 2014 च्या निवडणुकीत सुद्धा या पक्षाने भाजपचे हात धरले होते. 2009 मध्ये तेदेपने काँग्रेसला विरोध म्हणून तेलंगणा राष्ट्र समिती अर्थात टीआरएससोबत हातमिळवणी केली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment