0
 • If you wish, only the TV channel needs money
  नवी दिल्ली - टीव्हीवर जे चॅनल पाहण्याची इच्छा असेल, केवळ त्याच चॅनलचे पैसे ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. लवकरच ग्राहकांना तसा अधिकार मिळणार आहे. सध्या त्यांना ब्रॉडकास्टिंग कंपनीचा पूर्ण “बुके’ खरेदी करावा लागतो, ज्यामध्ये मोफत आणि सशुल्क (पे) असे दोन्ही प्रकारचे चॅनल असतात. वास्तविक दूरसंचार नियामक ट्रायने या संदर्भात एक आदेश जारी केला होता. मात्र, ब्रॉडकास्टिंग कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. स्टार इंडियाने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने स्टारची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता ट्रायच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  ट्रायने ३ मार्च २०१७ रोजी नवीन टेरिफचा ड्राफ्ट जारी केला होता. स्टार इंडिया आणि विजय टीव्हीने या आदेशाला आधी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणात ट्रायच्या बाजूने निकाल दिल्यानंतर या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या दरम्यान ट्रायने तीन जुलै रोजी आदेश जारी केला. त्या नुसार ब्रॉडकास्टरांना (उदा. स्टार, सोनी) ६० दिवसांच्या आत प्रत्येक चॅनलसाठी वेगवेगळी किंमत (एमआरपी) घोषित करायची होती. डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटरांनाही रिटेल दर घोषित करण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी त्यांना १८० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. या निर्णयामुळे ब्रॉडकास्टिंग उद्योगात पूर्णपणे बदल होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ज्या चॅनलला ग्राहक नसतील ते चॅनल या निर्णयामुळे बंद होतील. मोठे ब्रॉडकास्टर छोट्या कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचीही शक्यता आहे.
  सध्या मोफत-पे चॅनल मिळून एकत्र पैसे 
  सध्या ब्रॉडकास्टिंग कंपन्या त्यांच्या “बुके’मध्ये मोफत आणि सशुल्क (पे) दोन्ही प्रकारचे चॅनल एकत्र देतात. डीटीएच किंवा केबल ऑपरेटरांकडून या कंपन्या पूर्ण बुकेचे पैसे घेतात. हे ऑपरेटरही ग्राहकांकडून त्याच हिशेबाने पैसे वसूल करतात. जे चॅनल पाहण्याची इच्छा नसते, त्या चॅनलचेही ग्राहकांना पैसे द्यावे लागतात.

  २७ कोटी कुटुंबांपैकी १७ कोटींकडे टीव्ही 
  अखिल भारतीय डिजिटल केबल फेडरेशनच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण २७ कोटी कुटुंबांपैकी १७ कोटी कुटुंबांकडे टीव्ही आहे. यातील १४ कोटी पे टीव्हीचे ग्राहक आहेत. यांच्यातही १० कोटी केबल आणि ४ कोटी डीटीएच पाहतात. केबल ग्राहकांमध्येही जवळपास ३ कोटी ग्राहकांकडे डिजिटल कनेक्शन आहे

Post a Comment

 
Top