0
  •      नागरिकांना पासपोर्ट बनवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येउ नये म्हणुन सरकार देशातल्या सर्व जिल्ह्यात 'पासपोर्ट सेवा केंद्र' उघडण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासमध्ये आयोजित पासपोर्ट सेवा क्रार्यक्रमात दौरान सिंग यांनी सांगितले की, भारत सरकार देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट ऑफीस उघडण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच विदेशातही भारतीय नागरिकांना पासपोर्टसाठी कोणतीही अडचण येउ नये यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे.

    पासपोर्ट सेवा कार्यक्रमामुळे भारतात पासपोर्ट सेवेत खुप परिवर्तन आले आहे. विदेशातील भारतीय नागरीकांनाही याचा फायदा होइल. नवीन प्रकारे पासपोर्टसाठी अप्लाय करणे सोपे जाईल, त्यासोबतच पासपोर्ट मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. पुढे ते म्हणाले-सरकारची ही योजना आहे की, मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्राची स्थापना झाली पाहीजे. 2017 मध्ये पासपोर्टच्या सेवेमध्ये 19 टक्के वाढ झाली आहे.passport office in all district of India

Post a Comment

 
Top