मध्य प्रदेशमध्ये कडक बंदोबस्तात विधान सभेच्या २३१ जागांसाठी आज सकाळीपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सकाळपासूनच मोठी गर्दी झालेली आहे. या दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या विभागातील मतदानासाठी तैनात असलेल्या ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापेकी गुनातमद्ये एक आणि इंदौरमध्ये दोन अधिकाऱ्यांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे निवडणूक आयोगाने मुत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशात बालाघाट जिल्हातील नक्षलग्रस्थ विधानसभा क्षेत्रातील परसवाडा, बैहर आणि लांजीतील मतदान सकाळी सात वाजता सुरू झाले असून ते तीन वाजेपर्यत संपणार आहे. विधानसभा क्षेत्रातील २३० पेकी २२७ क्षेत्राचे मतदान सकाळी ८वाजता सुरू होवून सायंकाळी ५ वाजेपर्यत संपणार आहे.


Post a comment