नवी दिल्ली - तब्बल २१ वर्षांनंंतर देशातील ६२ डॉक्टरांच्या टीमने एमबीबीएसच्या (अंडर ग्रॅज्युएट) शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. तो आगामी शैक्षणिक सत्रापासून लागू केला जाईल. अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पेशालिटीचा काही अभ्यास करवून घेतला जाईल. जेणेकरून एमबीबीएस डॉक्टरचे महत्त्व वाढेल आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन केल्याविनाही सुरुवातीस प्रत्येक आजारावर त्याला उपचार करता येतील. विविध वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतून २२ पेक्षा जास्त विषयांच्या तज्ज्ञांनी हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
या पीजीतील काही भागही जोडण्यात आला आहे. जेणेकरून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व डॉक्टरांना प्रत्येक आजाराची प्राथमिक माहिती मिळेल व त्यावर उपचारही सुरू करता येतील. एमबीबीएसच्या पहिल्याच वर्षात विद्यार्थ्यांकडून आता थिअरीसोबतच प्रॅक्टिकलही करवून घेतले जातील. क्लिनिकल कामही पहिल्याच वर्षापासून करवून घेतले जाईल. म्हणजे पाच वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतर एमबीबीएसचा डॉक्टराची आधीच पूर्वतयारी झालेली असेल.नव्या अभ्यासक्रमात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार
गेल्या २० वर्षांत वैद्यकीय शिक्षणात प्रचंड बदल घडून आले आहेत. मात्र त्याचा जुन्या अभ्यासक्रमात उल्लेखही नाही. यामुळे नव्या अभ्यासक्रमात नव्या तंत्रज्ञानाबद्दल स्वतंत्रपणे अभ्यास करवून घेतला जाईल. सरकारकडून राबवल्या जात असलेल्या वैद्यकीय योजनांनाही अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रसूती आणि बालक आरोग्य, मल:निस्सारण आणि पाणी पुरवठा, कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल आजार, इम्युनायझेशन, आरोग्य शिक्षण, जैविक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याचाही अभ्यासक्रमात समावेश असेल. यासोबतच विविध संस्थांत काम करण्याची पद्धतही अभ्यासक्रमात शिकवली जाणार आहे.डॉक्टर-रुग्णांतील संबंध मजबूत होणार
गेल्या काही वर्षांत डॉक्टर आणि रुग्णांतील विश्वासात घट झाली आहे. ती भरून काढण्यासाठी आणि एकमेकांवरील विश्वास वाढीस लागण्यासाठी एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात निर्णय क्षमता, नैतिक मूल्ये, विविध कौशल्ये, अॅटिट्यूड, मूल्य शिक्षण आणि संवाद आदी इतर विषयांचाही समावेश करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment