0
नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना थांबवणे हा या मागचा हेतू आहे.
बिझनेस डेस्क - भारतातील दुसरी सर्वात मोठी टेक कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार दुपटीने वाढवण्यासाठी नवीन प्रोग्रामची घोषणा केली आहे. यात पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 80 ते 120 टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. अनेक कर्मचारी पुढील शिक्षण घेण्यासाठी, खास प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा काही वेगळे करण्यासाठी नोकरी सोडून जातात. अशाच कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न म्हणून इन्फोसिसने ही नवीन योजना आणली आहे. यामुळे कर्मचारी कंपनीतच राहून नवीन क्रिएटिव्हिटी करण्यास प्रोत्साहित केले जातील असे कंपनीने जाहीर केले आहे.
बंगळुरूत मुख्यालय असलेल्या इन्फोसिसचे HR Head क्रिश शंकर यांनी एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाशी संवाद साधताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. नोकरीत राहूनच कर्मचारी आपले पुढील शिक्षण घेऊ शकतील. एमबीए किंवा इतर काही नवीन करण्यासाठी आणि आपले स्किल्स डेव्हलप करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याची गरज राहणार नाही. त्यांना अशा प्रकारचे नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. सोबतच, त्यांना काम करताना आपले नवीन स्किल्स मिळवण्यात काहीच अडथळा येणार नाही. कंपनी आणि यातील कर्मचारी अशा दोहोंना याचा फायदा होईल. इन्फोसिसने यापूर्वी अशा प्रकारच्या योजनेसाठी 400 जण निवडले होते. यशस्वीरित्या प्रोग्राम पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 80 ते 120 टक्के पर्यंत पगारवाढ करण्यात आली. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे कर्मचारी नोकरी सोडून जाणार नाहीत असे कंपनीला वाटते.
Good news, Infosys employees Staff set to get double salaries

Post a Comment

 
Top