मेलबर्न,भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने पहिली लढत जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाचा मेलबर्नवर चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. मात्र, दुसऱ्या सामन्याला विलंब होण्याची शक्यता आहे. पावसाच्या आगमनाने खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यातील संघच याही सामन्यात कायम राखला आहे.
Post a Comment