0
 • Accused of hiding bin Laden; US Ambassador to the Eastइस्लामाबाद -आेसामा बिन लादेन दडलेला असल्याची माहिती लपवून पाकिस्तानने दिलेल्या आर्थिक मदतीचा हिंसाचारासाठी वापर केला, अशा आशयाचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केले होते. ते पाकिस्तानला चांगलेच झोंबले. त्यामुळेच्या वक्तव्य केल्याच्या चोवीस तासांतच पाकने अमेरिकेच्या मुत्सद्द्यास पाचारण करून नाराजी मांडली. पाकिस्तानलाच दहशतवादाची सर्वाधिक झळ पोहोचली, अशा शब्दांत पाकच्या परराष्ट्र मंत्री तहमिना जानजुआ यांनी राजदूत पॉल जॉन्स यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.


  पाकिस्तानातील दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी अमेरिकेने १.३ अब्ज डॉलर्सची मदत केली होती. मात्र, अल-कायदाचा म्होरक्या देशात असल्याची माहिती त्यांनी अमेरिकेपासून दडवून ठेवली होती. हे योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली, असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. पाकिस्तानचा हा मूर्खपणा असून ही माहिती त्यांनी जाणूनबुजून दडवली. त्यामुळे ११ सप्टेंबर २००१ रोजीच्या हल्ल्यात शेकडो निर्दोष लोकांना प्राण गमवावे लागले होते. पाकने अमेरिकेच्या मदतीच्या जोरावर अतिरेक्यांसाठी नंदनवन तयार केले. लादेन लपल्याची माहिती दडवल्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकेने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.पाकिस्तानचे सक्रिय सहकार्य नसते तर अल-कायदाचा म्होरक्या ठार होऊच शकला नसता, असे तहमिना यांनी सांगितले. पाकने सुमारे ७५ हजार लोक गमावले .
  पाकिस्तान मूर्ख आहे, जाणूनबुजून लादेनची माहिती दडवली : ट्रम्प 
  ट्रम्प ट्विटमध्ये म्हणाले की अमेरिकेने लादेनला अगोदरच पकडायला हवे होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी संधी गमावली. आपण पाकिस्तानला अब्जावधी डॉलर दिले. पण लादेन कुठे लपून बसलाय , ते त्यांनी सांगितले नाही. मूर्ख....
  पाकिस्तानला अमेरिकेकडून लढताना हानी झाली : इम्रान खान
  पाकचे पंतप्रधान इमान खान म्हणाले, दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेच्या बाजूने लढताना पाकिस्तानला खूप झळ सोसावी लागली. पाकला कारवाईची मोठी किंमत मोजावी लागली. आता आम्ही आमच्या लोकांसाठी जे योग्य व हिताचे असेल तेच करू.
  अमेरिका पाकिस्तानला दरवर्षी सुमारे ९३०० कोटी रुपयांची सुरक्षा मदत देते
  अमेरिका पाकिस्तानला दरवर्षी १३० कोटी डॉलर्स (सुमारे ९३०० कोटी रुपये) एवढी सुरक्षा मदत पुरवते. पाकिस्तानची ही मदत आता बंद करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले होते. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. त्यामुळे ही मदत बंद केली आहे, असे अमेरिकेने म्हटले होते. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते म्हणाले, पाकिस्तानच्या नेत्यांना अमेरिकेने वारंवार दहशतवादाला प्रोत्साहन देऊ नका, असे बजावले होते. मात्र त्याकडे पाकिस्तानने कानाडोळा केला.
  दहशतवाद्यांना रसद पुरवण्यावरून पाक एफएटीएफच्या काळ्या यादीत
  पाकिस्तान दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवते. त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शियल टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे च्या यादीत पाकचा समावेश झाला आहे. पाकिस्तान आजही रसद पुरवते, असे गेल्या महिन्यातच या संस्थेने स्पष्ट केले. म्हणूनच पाकिस्तानचा समावेश मनी लाँडरिंग प्रतिबंधक निगराणी संघटनेच्या काळ्या यादीत केला जाऊ शकतो. त्यापासून बचाव करायचा झाल्यास पाकला आपला कायदेशील ढाचा बळकट करावा लागेल. पाकिस्तानचा यादीत समावेश झाल्यास अगोदरच ढासळलेली अर्थव्यवस्था आणखीनच संकटात सापडेल. तिला जोरदार झटका बसेल. एफएटीएफचे ९ सदस्यीय पथक ८ ते १९ ऑक्टोबर दरम्यान पाकच्या पाहणीसाठी पाक दौऱ्यावर होते.
  पाकिस्तानात २० हून जास्त अतिरेकी संघटना सक्रिय, अमेरिकेकडून यादी
  अमेरिकेने पाकिस्तानात सक्रिय २० हून अधिक दहशतवादी संघटनांची यादी तयार केली आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद, हरकत-उल-मुजाहिदीनसह २० संघटनांचा समावेश आहे. यादीत पाकिस्तानातील तीन प्रकारच्या दहशतवादी संघटना आहेत. त्यापैकी अनेक दहशतवादी काश्मीरमध्ये हल्ले करतात. दुसऱ्या प्रकारातील अफगाणिस्तानात तर तिसऱ्या प्रकारातील दहशतवादी केवळ अंतर्गत पातळीवर दहशतवादी कारवाया करतात. हे सर्व दहशतवादी भारताला पाकिस्तानातून लक्ष्य करू लागले आहेत, असे अमेरिकेला वाटते. अमेरिकेने यादीत सर्वात आधी हक्कानी नेटवर्कला ठेवले आहे. ही संघटना वायव्येकडील आदिवासी भागात सक्रिय आहे.
  अमेरिकेचे खासदार म्हणाले-पाकच्या आसियाला अमेरिकेत आश्रय द्यावा
  पाकिस्तानची आर्थिक रसद बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचे अमेरिकेचे खासदार रँड पॉल यांनी समर्थन केले. त्यांनी रिट्वट करून त्याच्याशी सहमती दर्शवली. आपण पाकवर दबाव वाढवला पाहिजे. ट्रम्प यांनी ख्रिश्चन महिला आसिया बीबीला अमेरिकेत आश्रय दिला पाहिजे. पाकिस्तानात असिया कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आहे.

Post a Comment

 
Top