0
नॅशनल डेस्क:- प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण शिकून सवरून चांगल्या उच्चपदावर नोकरी करावी. त्याचप्रमाणे दिल्लीत राहणाऱ्या एका मुलीने इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घेतले आणि दिल्ली विद्यापीठातून बीकॉम पूर्ण केल्यानंतर CS परीक्षेचा देखील अभ्यास करण्यास सुरुवात केली. शिक्षणाच्या बळावर तिला गुगलसारख्या नामांकित कंपनीत नोकरीही मिळाली. जवळपास वर्षभर तिने जॉब केला. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक सर्व गोष्टींचा तिने त्याग केला आणि वैराग्याचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.

गुगलमधील नोकरी सोडून बनली साध्वी
दिल्ली येथे वाढलेल्या साध्वी ब्रह्मादिनी देवी स्कंद या एका मोठ्या उद्योगपतीच्या कन्या आहेत. त्यांनी सांगितले की, शिक्षण घेत असताना आई-वडिलांसह मी नेहमी मंदिरात तसेच गुरुमातेचे दर्शन घेण्यासाठी जात असे. एक दिवस आईसोबत गुरुमातेकडे दर्शनासाठी गेले असता त्यांनी देवाबद्दल व सन्मार्गाबद्दल सांगितलेल्या प्रवचनाने मी  प्रभावित झाले. आणि घरी वैराग्याचा मार्ग निवडण्याबाबत विचारले. इच्छा व्यक्त करताच आईने मान्यता दिली. मात्र, वडिलांची मान्यता मिळवणे जरा कठीण होते. गुरुमातेच्या आदेशाने अखेर निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आणि माझी इच्छा पाहून वडिलांनी आणि भावानेदेखील होकार दिला.

धर्मसंसदेत सर्वात कमी वयाची आहे साध्वी

काशी येथे सुरू असलेल्या धर्मसंसदेत भाग घेतलेल्या ब्रह्मादिनी देवी स्कंद सर्वात कमी वयाच्या प्रतिनिधी आहेत. या धर्मसंसदेत राम मंदिराच्या मुद्दयांवरही चर्चा केली जात असते.
girl left job of google and became sadhvi

Post a Comment

 
Top