0
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक उडाली. यात 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांचा गोळीबारात एक जवान शहीद झाला. येथील कपरान बाटागुंड परिसरात दहशतवादी दबा धरून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच एनकाउंटर सुरू झाले. घटनास्थळावरून एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. सोबतच, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शोपिया जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
शुजात बुखारींच्या मारेकऱ्याचा खात्मा      
  • यापूर्वी शुक्रवारी सुद्धा अनंतनागमध्ये अशाच प्रकारच्या एक चकमक उडाली होती. त्यामध्ये 6 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये रायजिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांचा मारेकरी सुद्धा होता. श्रीनगरच्या लाल चौक परिसरात 14 जून रोजी बुखारी यांची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोन जवान सुद्धा शहीद झाले होते.           jammu kashmir security forces encounter terrorists killed news and updates

Post a comment

 
Top