0
 निसर्गमित्र या संस्थेने आवाहन केल्यामुळे सरनोबतवाडी येथील शालेय विद्यार्थांनी फटाके न उडविण्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी तशा आशयाची संकल्पपत्रे तर लिहून दिली आहेतच, शिवाय सुमारे १५० पत्रे लिहून व्यापारी व उद्योजक वर्गाला फटाके न उडविण्याचे आवाहनही केले आहे. या संकल्पपत्रामध्ये एकूण ८१ हजार रुपयांचे फटाके उडविले जाणार नाहीत, असा संकल्प या विद्यार्थ्यांनी केला.

निसर्गमित्र संस्थेने दिवाळीनिमित्त फटाकेमुक्त अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील विकास विद्यामंदिर येथे पर्यावरण रक्षण, प्रगतीचे लक्षण या विषयावर निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. एस. बडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अभय कोटणीस उपस्थित होते.
Kolhapur: Resolutions of students of Saranobatwadi not throwing firecrackers | Diwali कोल्हापूर :फटाके न उडविण्याचा सरनोबतवाडीतील विद्यार्थ्यांचा संकल्प

Post a Comment

 
Top