स्पेशल डेस्क - भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आणि बिग बॉस फेम राहुल महाजनने तिसऱ्यांदा विवाह केला आहे. राहुल महाजनने यापूर्वी पायलट राहिलेली श्वेता सिंह हिच्याशी पहिला विवाह केला होता. 10 वर्षांनंतर तिला घटस्फोट दिला. त्यानंतर राहुलने एका रियालिटी शोच्या माध्यमातून डिम्पी महाजन हिच्याशी दुसरा विवाह केला. दुसरा विवाह सुद्धा जास्त टिकू शकला नाही. त्यामुळे दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला. आता राहुल महाजनने परदेशी मॉडेलला नतालिया इलिना हिला आपली तिसरी पत्नी बनवले आहे. तर नेमकी कोण आहे नतालिया इलिना याची माहिती आम्ही देत आहोत.
- नतालिया इलिना ही मूळची कझाखस्तानची आहे. ती एक प्रोफेशनल मॉडेल आहे. गेल्या 4 वर्षांपासून तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉडेलिंगचे असाइनमेंट केले आहेत. तिने आपल्या आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग करिअरची सुरुवात 2011 च्या बीजिंग फॅशन वीकमधून केली होती - राहुल आणि नतालिया यांची भेट दीड वर्षांपूर्वी एका इव्हेंटमध्ये झाली होती. परदेशी मॉडेलच्या सौंदर्यावर राहुल असा फिदा झाला की त्याने अवघ्या काही महिन्यांच्या डेटिंगनंतर लग्नाचा निर्णय घेतला. राहुल (41) आणि नतालिया यांच्या वयात मोठे अंतर आहे. तरीही आपली जोडी चांगली दिसते असे राहुलने म्हटले आहे.
. त्यावेळी तिचे वय फक्त 18 वर्षे होते. 

Post a Comment