0
  • दंतेवाडा - छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच नक्षलवाद्यांनी गुरुवारी मोठा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात आयईडी स्फोट घडवून सीआयएसएफची बस उडवून दिली. त्यात एक जवान शहीद झाला असून तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सात जवान जखमी झाले असून त्यापैकी तीन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात गेल्या सात दिवसात केलेला हा दुसरा हल्ला असून या हल्ल्यामुळे छत्तीसगड हादरून गेलं आहे.
    दंतेवाडाच्या बचेली येथे हा हल्ला झाला.

    सीआयएसएफची एक टीम मिनी बसमधून आकाश नगरकडे जात होती. ही टीम रुटीन गस्तीवर होती. मात्र येताना सहकाऱ्यांसाठी त्यांना बाजारातून भाजीपालाही आणायचा होता. आकाश नगरच्या मोड नंबर ६ वरून बस वळण घेत असतानाच नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला. त्यामुळे ही बस ८ फूट उंच उडाली. ही बस पुन्हा जमिनीवर आदळताच नक्षल्यांनी जवानांवर प्रचंड गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी सुमारे १५ मिनिटं गोळीबार केला आणि घोषणाबाजी करतच तिथून निघून गेले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या छत्तीसगडच्या जगदलपूर येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. दंतेवाड्यापासून जवळ असलेल्या बस्तर विधानसभा मतदारसंघात जगदलपूर आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणरा आहे. १२ नोव्हेंबरला पहिल्या तर १८ नोव्हेंबरसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी हे मतदान होणार 
    Four killed in Naxalite attack in Dantewada; CISF boats, a young martyr

Post a Comment

 
Top