- जळगाव- असोदा रेल्वेगेटजवळील नाल्यामध्ये गुरुवारी शिर नसलेला कुजलेल्या अवस्थेतील सुमारे 30 ते 35 वयोगटातील तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी साडे सात वाजता आढळून आल्याने खळबळ उडाली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास अग्निशमन बंबातील पाण्याच्या प्रेशरने नाल्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आला.नाल्याजवळ भरत चंपालाल दरडेकर (रा. हरीओमनगर) या युवकाची पानटपरी आहे. काही दिवसांपासून या युवकासह रेल्वे गेटमनला या परिसरात दुर्गंधी येत होती. ती दुर्गंधी वाढतच गेली. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. गुरुवारी गेटमनने शनिपेठ पोलिसांना या प्रकाराबाबत कळविले. सकाळी 10 वाजता पोलिस निरीक्षक ससे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नाल्यामध्ये पाणी वाहत असल्याने पोलिसांनी मृतदेह शोधण्यासाठी काही युवकांना सोबत आणले होते; परंतु पाणी वाहत असल्याने नाल्यामध्ये मृतदेह आढळून आला नाही. नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी टाकलेल्या पाइपमध्ये मृतदेह अडकलेला असल्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. मात्र, त्या पाइपमध्ये जाऊन मृतदेह काढणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी अग्निशमन बंब बोलावला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बंबातील पाणी दाबाने पाइपमध्ये मारले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाइपातून मृतदेह वाहत रस्त्याच्या दुसऱ्या कडेला असलेल्या नाल्यात आला. शिर नसलेला तो मृतदेह कुजलेला होता. संपूर्ण शरीरावर अळ्या पडलेल्या होत्या. तसेच दुर्गंधी खूप येत होती. चार ते पाच िदवसांपूर्वीपासून तो मृतदेह नाल्यामध्ये असण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्या अनाेळखी तरुणाचा मृत्यू अपघात की घातपात याबाबत शनिपेठ पोलिस तपास करीत आहेत.मनोरुग्णाचा मृतदेह असल्याबाबत संशय...
भरत दरटेकर याला 19 नोव्हेंबरपासून त्याच्या असोदा रेल्वेगेटलगत असलेल्या पानटपरीच्या परिसरात एक मनोरुग्ण नग्नावस्थेत फिरत असलेला दिसत होता. त्याला काही खाण्यास दिल्यास तो फेकून देत होता. 21 नोव्हेंबर रोजी तो गटारीजवळ पडल्याने भरतने त्यास बाहेर काढून रस्त्यावर आणले होते. त्यानंतर तो दिसला नाही. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता नाल्यात मृतदेह आढळून आला. तो त्या मनोरुग्णाचा असल्याबाबत भरतने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment