0
  • Amit Shah , Rahul Gandhi teaches discipline: Ashok Gehlotजोधपूर/झुंझुनूं 
    - राजस्थानच्या झुंझुनूंत मंगळवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत म्हणाले की, अमित शहा गुंडगिरी, तर राहुल गांधी शिस्त शिकवतात. निवडणूक आयोगाने शहांविरोधात कारवाई करायला हवी. दुसरीकडे, जालोर आणि सिरोहीच्या सभांत भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, राहुल गांधींनी राज्यात सरकार स्थापनेचे स्वप्न पाहणे बंद करावे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनंतर सरकार बदलण्याचे मिथक या वेळी भाजप तोडणार आहे.

    गहलोत म्हणाल की, वसुंधरा राजे आणि अमित शहा यांच्या वयात फारसा फरक नाही, पण त्या एवढ्या झुकल्या आहेत की प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे. देशात सध्या मोदी आणि अमित शहांचे राज्य सुरू आहे. शहा गुंडगिरीचे धडे देतात, तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी लोकांना परस्पर सद्भाव, प्रेम, शिस्त आणि सहकार्य ही शिकवण देतात. वसुंधरा सरकारने काँग्रेसच्या काळात सुरू केलेल्या योजना बंद केल्या, असा आरोप करून गहलोत म्हणाले की, पेन्शन, मोफत औषधे, मेट्रो, रिफायनरी यांसारख्या योजना या सरकारने बंद तरी केल्या किंवा कमजोर केल्या. त्याउलट आम्ही आधीच्या भाजप सरकारची कोणतीही योजना बंद केली नाही. आम्ही राज्यात अनेक वर्षेे सत्ता चालवली, पण कधीही राजकीय शत्रुत्व बाळगले नाही.आज राज्यातील युवकांसमोर बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आम्ही सर्वाधिक रोजगार देऊ.
    भाजपने नेहमीच विकासाकडे लक्ष दिले; सरकार अंगदासारखे, ते हलवणे कठीण जालोरच्या सभेत अमित शहा सभेत म्हणाले की, मोदी सरकारच्या सहकार्याने राजस्थानात वसुंधरा राजेंनी विकासाची गंगा आणली आहे. समाजातील प्रत्येक वर्ग आणि भागाचा विकास केला आहे. विकासाचा हा क्रम पुढेही सुरू ठेवण्याची गरज आहे. राजस्थानमध्ये अंगदाच्या पायासारखे भाजपचे सरकार आहे, ते कोणीही हलवू शकत नाही. मी येथे आमच्या कार्यकाळाच्या क्षणाक्षणाचा आणि पै न् पैचा हिशेब घेऊन आलो आहे. भाजप सरकारने नेहमीच विकासावर आपले लक्ष केंद्रित केले आहे, असा दावा शहा यांनी केला.

Post a Comment

 
Top