- कोल्हापूर- गुरु-शिष्यच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने पाचवीत शिकणार्या मुलीचा विनयभंग केला आहे. कागल तालुक्यातील बोळावी येथे ही घडली आहे. सुनील कांबळे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. संतप्त गावकर्यांनी आरोपीला बेदम चोप दिला आहे.
मिळालेली माहिती अशी की, आरोपी सुनील कांबळे याने पाचवीतील मुलीचा विनयभंग केला. या घटनेमुळे गावकर्यांमध्ये संतापाची लाट पसरली. गावकर्यांनी शाळेत धाव घेवून आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला. यात आरोपी जखमी झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीविरोधात मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावकर्यांनी शाळेत धाव घेवून आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment